पान:रुपया.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १0७)

 शिलकींतही पुष्कळ रुपये जास्त जमा झाले. एकंदर ३० कोटि रुपये याप्रमाणे चलनांतून काढावे लागले.
  प्रौढांचे रुपये देणे व रुपयाचे पौंड देणे हे सुवर्णसंलग्नपद्धतीचे हृद्गत असल्यामुळे, हुंड्या व पौंड जितके हिंदुस्थानांत येतील तित: क्यांच्या मोबदला रुपये देता येतील इतका रुपयांचा निधि हिंदुस्थानांत पाहिजे. त्याचप्रमाणे उलटहुंड्या विकण्याचा प्रसंग आल्यास त्या सर्व पटविण्याइतके सोने इंग्लंडांतील निधींत पाहिजे. ही त्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी आहे. हल्लीच्या धोरणाप्रमाणे जितके रुपये निधीत जास्त असतील तितके सोने कमी असते. रुपये कमी असल्यास सोन्याच्या मोबदला नवीन रुपे घेऊन ते पाडतां येतात. परंतु सोन्याचा निधि कमी असल्यास, हुंडणावळ खाली जाऊन मुवर्णसंलग्नचलनाचा पाया डळमळीत होतो. याकरितां रुपये अगदीं आवश्यक तेवढे ठेवावे व पौंडाचा निधि जास्त प्रमाणांत ठेवावा. १९०७ च्या संकटकाळच्या अनुभवावरून पाहिले तर, दोनही निधींत मिळून चाळीस कोटींचे सोने अथवा सिक्यूरिटी ठेवणे अत्यावश्यक आहे.
 रुपये अगदीं आवश्यक तेवढे ठेवल्यास, संकटकाळी रुपे किती विकत घेता येईल व ते कोणत्या भावाने विकत घेता येईल ह्याचा पूर्ण विचार केला पाहिजे. एक मार्ग असा आहे की, गुप्त रीतीने एखाद्या दलालाच्या मार्फत रुपे खरेदी करणे ; दुसरा मार्ग झणजे राजरोस बाजारांत जो भाव पडेल तो देऊन खरेदी करणे.