पान:रुपया.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



[ १०६ ]

 आतां उलट हुंड्या १० कोटींच्या विकल्या अशी कल्पना करा. हे पैसे ४ कोटि सिक्यूरिटी विकून व ६ कोटींचे सोने देऊन फेडून टाकले. बाकी इंग्लंडांत फक्त २ कोटींचे सोने राहिले, परंतु कायद्याप्रमाणे ४० कोटि रोख शिल्लक पाहिजे आतां फक्त हे दोन कोटि रुपये व हिंदुस्थानांत ३२ कोटि रुपये मिळून ३४ कोटि राहिले. त्यामुळे आणखी ६ कोटि रुपये चलनांतून काढून किंवा खजिन्यांतून काढून हिंदुस्थानांत शिल्लक ३८ कोटि केली पाहिजे. त्याचप्रमाणे सिक्यूरिटी १४ कोटींच्या ऐवजी १० कोटिच राहिल्या. म्हणून हिंदुस्थानांतील रुपयांच्या सिक्यूरिटी येथील निधींत घातल्या पाहिजेत; किंवा आणखी ४ कोटि रुपयांचे पौंड किंवा रुपये येथील निधींत घातले पाहिजेत. म्हणजे जेवढे इंग्लंडमध्ये ' उणे ' होईल, तेवढे हिंदुस्थानांत अधिक केले पाहिजे.

 यावरून असे दिसून येईल की, रुपये चलनांतून काढण्याची शक्ति असल्याशिवाय उलट हुंड्या विकणे अशक्य असते व जितके रुपये काढतां येतील तितकेच सोने इंग्लंडांत दिले पाहिजे. येथील नोटांच्या निधीत ११ कोटि ५० लक्ष रुपये १९०८च्या मार्चमध्ये घातले ; डिसेंबरमध्ये निधीत घातलेले एकंदर रुपये ५६ कोटि ४० लक्षांपर्यंत गेले. नंतर सुवर्णचरुननिधींतून इंग्लंडांत सोने दिल्यामुळे येथील सुवर्ण चलननिधींत १९०८ च्या नोव्हें महिन्यांत १३ कोटि रुपये भरावे लागले. याशिवाय नेहमीच्या