पान:रुपया.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ १०५ ]

हूंडणावळ खाली गेल्यामुळे १९०९ च्या ऑगस्ट महिन्यांत पुन्हां उलट हुंड्या विकणे भाग पडले. यानंतर अशा तऱ्हेचे संकट महायुद्धापर्यंत आलं नाही. तथापि या कालाच्या इतिहासांवरून हल्लीच्या सुवर्णसंलग्नचलनाप्रमाणे इंग्लंडांत किती रक्कम पौंडांत ठेविली पाहिजे याचा अंदाज करता येईल.

 आतां इंग्लंडांत पौंड द्यावयाचे ते जोपर्यंत शिलकेंतून देतां येतात तोपर्यंत हिंदुस्थानांतील रुपयांस धक्का पोचत नाही. परंतु सुवर्णचलन निधि व नोटांचा निधि यांतून ते पौंड दिल्यास तितकेंच रुपये चलनांतून काढून त्या त्या निधींमध्ये हिंदुस्थानांत घालावे लागतात. उदाहरणार्थ, एकंदर चलनांत ५४ कोटींच्य। नोटा असल्यास कायद्याप्रमाणे १४ कोटि सिक्यूरिटी ठेवण्याची परवानगी आहे व बाकीचे ४० कोटि पौंड किंवा रुपये रोख असले पाहिजेत. याची विल्हेवाट खाली लिहिल्याप्रमाणे आहे अशी कल्पना करा.

इंग्लंडांत ( लक्ष )   हिंदुस्थानांत ( लक्ष )
सिक्यूरिटी ४,   सिक्यूरिटी १०, + २
इंग्लंडांत सोनं ८,   हिंदुस्थानांत सोनं १५,
_______  हिंदुस्थानांत रुपये १५, + ८
१२    हिंदुस्थानांत रुपें २,
१०   ________________
     ४२,+१०