पान:रुपया.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




( १०४ )

दिवसांनी एक आठवड्यांत १ १/२ कोटींच्या उलटहुंड्या विकल्या, याबद्दलची रक्कम सुवर्णचलननिधीतून सिक्यूरिटी विकून पैदा केली. १९०८च्या आगष्टपर्यंत एकंदर १२ कोटींच्या उलटहुंड्या विकल्या. या सुमारास निधीपैकी पौंडांच्या भागाची स्थिति पुढीलप्रमाणे होती.

       साने हिंदुस्थानांत     २२ लक्ष. 
        सोने इंग्लंडांत      २,७० , 
      बँक ऑफ इंग्लंडमध्ये  २,७० 
       सिक्यूरिटी          ११,०० 
            _____________________
                     १६,६२. लक्ष. 

 सप्टेंबर १९०७ मध्ये स्टेटसेक्रेटरीजवळ ४६३ कोटि पौंडांचा ऐवज होता तो सप्टेंबर १९०८ मध्ये १६,६२ लक्षांवर आला ; म्हणजे अदमासे ३० कोटि रुपयांचे निःसारण झाले. याशिवाय आपला खर्च भागविण्याकरितां स्टेटसेक्रेटरीने १० कोटींचे कर्ज काढलें तें अलाहिदा. एकंदरीत अदमासे ४ कोटींची तूट या संकटांत आली.

 याच वेळेस आणखी एक दुष्काळचे साल असते तर निधींची स्थिति फार वाईट झाली असती. २०|२५ कोटीचे नवीन कर्ज काढावे लागले असते. सुदैवाने हे वर्ष सुबत्तेचे होते, त्यामुळे पुन्हां निर्यात सुरू होऊन हुंड्यांची मागणी सुरू झाली. यानंतर