पान:रुपया.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




( १०३ )

निधींमध्यें व शिलकांत जास्त झाले व पौंडांचा संचय कमी झाला. उलटहुंडया विकल्यामुळे निधींमधील पौंडांच्या सिक्यूरिटी व रोख पौंड यांवर गदा आली. सुदैवाने हा निधींचा भाग सुस्थितीत होता. १९०७ च्या सप्टेंबरमध्यें स्टेट सेक्रेटरीजवळ १५ १/२ कोटींचे सोने, ८ कोटींचे थोडक्या मुदतीने दिलेले कर्ज, ब २३ कोटींच्या सिक्युरिटी होत्या. हुंड्यांची मागणी कमी झाल्यामुळे नवीन सोने मिळणे शक्य नव्हते.

 यामुळे हूंडणावळ खाली जाऊ लागली व रुपयाची किंमत १५ १/२पेन्सांवर आली. या वेळेस एकदम ३ । ४ कोटींच्या उलटहुंड्या विकल्या असत्या म्हणजे कार्य झाले असते; परंतु थोड्या थोड्या उलटहुंड्या सरकारने भीत भीत विकल्या त्यामुळे सोने जाऊनचे जाऊन हुंडणावळीवर परिणाम झाला नाहीं. हुंड्या न विकल्यामुळे, स्टेट सेक्रेटरीने आपल्या खर्चाकरितां नोटांच्या निधींमधून रक्कम काढली व तितकीच रक्कम येथील नोटांच्या निधींत हिंदुस्थान सरकारने घातली. डिसेंबरमध्ये सरकारने उलटहुंड्या. वाटेल त्या प्रमाणावर विकण्याचे जाहीर केले. यानंतर लोक उलटहुंड्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करू लागले. त्यामुळे मार्च १९०८ मध्ये सर्व निधींतील सोनें संपून गेलें व फक्त सिक्यूरिटी व थोडक्या मुदतीने दिलेले कर्ज एवढींच शिल्लक राहिली. एप्रिलमध्ये पुनः हुंडणावळ खाली गेली. नंतर दरआठवड्यास ७५ लक्ष रुपयांच्या उलटहुंड्या विकू लागले. कांहीं