पान:रुपया.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




( १०२ )

 डिसेंबर महिन्यांत येथील खजिन्यांतील रुपं सर्व संपले व खजिन्यांत रुपये १८ कोटि होते ते ७।। कोटींवर आले. परंतु इंग्लंडांत हुंड्याची मागणी जोरांत असल्यामुळे, हुंड्या विकणे भाग होते; परंतु इतके रुपये शिल्लक नसल्यामुळे, स्टेट सेक्रेटरीने हुंड्यांचा दर १६ ५/३२ पेन्स असा केला. मध्यंतरी रुपे खरेदी करून, ते हिंदुस्थानांत पाठवून जास्त रुपये पाडून घेतले व १९०६ च्या मार्च महिन्यांत पुनः खजिन्यांत १५ कोटि रुपये झाले व त्यामुळे काळजी दूर झाली. यानंतर असा पुनः प्रसंग येऊ नये म्हणून सरकारने रुपये पाडण्याचा सपाटा चालविला. व रुपये नोटांच्या निधीत जास्त झाले म्हणून कांहीं रुपये सुवर्णचलननिधीत जमा केले.जून महिन्यांत एकंदर शिल्लक ३२ कोटि रुपये होते. नंतर तेजीच्या मोसमांत कांहीं रुपये कमी होऊन १९०७ च्या मार्चमध्ये २० कोटि रुपये शिलकीत राहिले. पूर्वच्याप्रमाणे संकट येईल या भीतीने सरकारने रुपये पाडण्याचे बंद न करितां, पुनः रुपये पाडून एकंदर शिल्लक १९,०७ च्या सप्टेंबरमध्ये ३१॥ कोटींवर आणून सोडली.

 १९०७ चा पावसाळा चांगला झाला नाहीं व अवर्षणामुळे दुष्काळ पडला. दुष्काळ पडला. म्हणजे निर्यात माल कमी होते व आयात आहे तसाच राहून, ‘प्रतिकूल व्यापाराची स्थिति येते हे पूर्वी स्पष्ट केलेच आहे. या नियमाप्रमाणें हुंड्यांची मागणी कमी होऊन उलटहुंड्यांची मागणी सुरू झाली. रुपये