पान:रुपया.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[ १०० ]

यापैकीं सोने किंवा पोंड हे इंग्लंडांत ठेवावे किंवा हिंदुस्थानांत ठेवावे. १९१२ मधे या निधीचा तपशील खाली दिल्याप्रमाणे होता.

      पौंडांच्या सिक्यूरिटी   ३,७५ लक्ष.  
      रुपयांच्या सिक्यूरिटी  ९,७५,, 
      इंग्लंडमध्ये सोने     १०,८७  
     हिंदुस्थानांत सोने     २६,२५ 
     हिंदुस्थानांत रुपये    १२,७५ 
     हिंदुस्थानांत रु       २,२५ 
            ____________________
                   ६५,६२ लक्ष. 

 या दोन निधींशिवाय सरकारी खजिन्यांत रुपये व पौंड असतात. यांना ' शिल्लक असें म्हणतात. ही शिल्लक करांचे पैसे, नवीन काढलेले कर्ज, इत्यादि बाबींच्या अनुरोधानें कमीजास्त होते. ही शिल्लक हिंदुस्थानांत व इंग्लंडांत अशा दोनही ठिकाणी असते. इंग्लंडांतील शिलकेस स्टेटसेक्रेटरीची शिल्लक असे म्हणतात. हिंदुस्थानांतील शिल्लक सरकारी खजिन्यांत असते. असे खाजने प्रत्येक जिल्ह्यांत असतात. याशिवाय तीन रिझर्व्ह टेझरीज़ ' म्हणजे मोठे खजिने असतात. याशिवाय सरकारी बँकांत कांहीं शिल्लक ठेव म्हणून ठेवलेली असते. जिल्ह्याच्या खंजिन्यांत रोजच्या व्यवहारापुरती शिलक ठेवून बाकीची मोठ्या खंजिन्यांत पाठवितात.खंजिन्यांत या रुपये असतात ते बेतापुरते असतात. त्यामुळे विशेष रुपयांची मागणी आल्यास नोटांच्या निधीतील