पान:रुपया.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ९९ ]

पुढीलप्रमाणे होत्या. आतां हुंडणावळ १६ पेन्सांच्या खाली गली म्हणजे उलटहुंड्या विकाव्या लागतात व त्याबद्दल सोने अथवा पौंड इंग्लंडांत द्यावे लागतात, म्हणून या निधीपैकी बहुतेक भाग इंग्लंडमध्ये ठेवण्याचे ठरविले; परंतु अशा प्रसंगी सिक्युरिटी विकाव्या लागतील व त्यांमध्ये तोटा होईल, करितां सिक्यरिटी कमी करून, सोने अथवा सोन्याचे नाणे जास्त प्रमाणांत ठेवावे असे निश्चित केले. नोटांच्या निधीतून सोने काढून घेऊन त्यांमध्ये रुपये ठेवावे म्हणजे १५ कोटि रुपयांचे सोने जमेल व नंतर अर्धा निधि सोन्याच्या रूपांत ठेवावा. १५ २९/३२ पेन्स या दराने कोणीही उलटहुंड्या मागितल्यास त्या हिंदुस्थानांत विकाव्या.

 १९१६ च्या मार्चमध्ये या निधीतील रकमेचा तपशील खालीं लिहिल्याप्रमाणे होता.

        इंग्लंडांत सिक्यूरिटी    २४,३२,७०,००० रुपये 
        रोख सोन्याचे नाणे     ८,६८,८०,००० 
        हिंदुस्थानांत सोनें      ३५,७०,००० ,,
        नेहमीच्या शिलकेंत     ६,००,००,००० 
       कर्जाऊ घेतले (हिंदुस्थानांत)____________
                           ३९,३७,२०,०००  

 नोटांचा निधि हा दुसरा निधि होय. यांतील सिक्यूरिटी किती असाव्या हे कायद्याने ठरविलेले असते; याशिवाय बाकीचा सर्व निधि सोने किंवा पौंड व रुपें किंवा रुपये या रूपांत असला पाहिजे.