पान:रुपया.pdf/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(९८ )

६,७५ लक्ष ट्रेझरी बिल्स ; ७,१० लक्ष एकतचेकर बॉड्स ( हे दोनही इंग्लंडांतील गव्हर्मेटचे कर्जरोखे आहेत. यांचे पैसे थोडक्या मुदतींत मिळू शकतात. हिंदुस्थानांत टेझरी विल्स काढलेली सर्वांना माहीत आहेतच, त्याप्रमाणेच हीं असतात.) १०,५० कनसोल्स ( आपल्याकडे सरकारी प्रॉमिसरी नोटा असतात त्याचप्रमाणे इंग्लंडांत कन्सोल्स असतात. यांचे पैसे लवकर मिळत नाहींत ); २,२५ लक्ष ( कॅनडा, ऑस्ट्रेलिया, कलोनियल सिक्युरिटी इत्यादि देशांतील सरकारच्या प्रॉमिसरी नोटा ); एकूण २७ कोटि सिक्यूरिटी ; १,५० लंडन येथील बँकांस व्याज दिलेले; ५,६२ लक्ष हिंदुस्थानांत रुपये ; ३७ लक्षांचे इंग्लंडांत सोने.

 त्या वेळचे धोरण असे होते की, हा निधि जवळ जवळ ४० कोटींपर्यंत वाढल्यानंतर, मग रुपये पाडल्यामुळे जो नफा होईल तो दुसन्या कामाकडे लावावयाचा; परंतु मध्यंतरीं सोन्याचे चलन करण्याची कल्पना सरकारने सोडून दिली व या निधीचा उपयोग फक्त हुंडणावळ स्थिर राखण्याकरितां करावयाचा असे ठरविले. नंतर चेंबरलेन कमिशनने हे धोरण पसंत करून, सोन्याचे चलन करणे हे मूर्खपणाचे आहे असे ठरविलें ! सुवर्णचलनासारखें उत्क्रांतीच्या उच्च शिखरावर गेलेलें चलनच हिंदुस्थानास हितकर आहे असे ठरवून, त्यांनी हा निधि मुख्यत्वेकरून इंग्लंडमध्ये ठेवावा असेही सुचविले. याशिवाय इतर चेंबरलेनकमिशनच्या सूचना