पान:रुपक.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लता बापू रूपा बापू लता रूपा बापू लता रूपा लता रूपा लता बापू पाणी देऊ का आणखी. दे थोडंस ! (पाणी पितो ) (रूपा ट्रेमध्ये कॉफीचे मग घेऊन येते )

आता पाणी ठेव ! गरमगरम कॉफी घे. बरं वाटेल. (आदरानं

बापूला, लताला कॉफी देते. स्वतःचा मग घेऊन घुटका घेते. बापू आणि लताच्या कपात विषारी कॅप्सुल तिनं आतूनच घालून कॉफी आणलीय)

(घुटका घेत) व्वा ! उत्तम झालीय कॉफी.
रूपाचा हात कोण धरेल कॉफी करण्यात.
ऑफिसमध्येसुध्दा मशिनवर एस्प्रेसो कॉफी मीच करते.
रूपा, तुझ्या हातची कॉफी प्यायल्याशिवाय दिवस संपतो का कधी? : आणि बापू, इतक्यावेळा रूपानं कॉफी दिली, पण चवीत काहीच फरक नाही. पहिल्यांदा केली होती, तशीच चव आहे.
चव बदलायचं कारण काय ? सगळं तेच तर आहे. म्हणजे दुधाच्या क्वॉलिटीत फरक नाही. कॉफी तीच ! कॉफी करणारी तीच आणि पिणारी माणसंही तीच ! मग फरक काय पडणार !
असं नको म्हणूस. मला एकाच चवीची कॉफी कधी करता आलेली नाही. (दोघांच्या कॉफीचे घुटके संपत आले आहेत लतानं कॉफी संपवली आहे.)
(तिचा कप घेऊन) मॉम, तू असं म्हणावंस ?
तुला उगीच फुगवायचं काय कारण ?

सो माय डियर रूपा, तुला आणखी एक अत्यानंदाची बातमी मी सांगतोय. (कॉफी संपवतो) रूपा, तसं पाहायला गेलं तर आपलं काही रक्ताचं नातं नाही. पण तुझ्यात मला माझी मुलगी दिसते. तू म्हणजे आमचं आमच्या घरात न जन्मलेलं अपत्य ! तुझा आवेश, तुझी घडाडी, तुझी निर्णय क्षमता, तुझी गुणवत्ता या सगळ्या गोटी आम्ही पाहत होतो. वडिलांविना वाढलेली तुझ्यासारखी मुलगी, भले कधी चुकलीही असेल. पण स्वत:च्या फीलिंगशी तिनं कधी प्रतारणा केली नाही. (लताला गुंगी येतेय) रूपा, तुला सांगायला आनंद वाटतो. आज सकाळीच आम्ही जेव्हा रुपक । ६३ ।