पान:रुपक.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बापू लता बापू लता रूपा बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू (बापू तिच्या आग्रहाखातर डान्स करतो रूपा त्याला साथ देते. नृत्याची गती वाढल्यानं त्याला ढास लागते.)

(खोकत) आता बस झालं. (रूपा म्युझिक प्लेअर ऑफ करते ) : (बापूला आवरत) काय होतंय बापू ?
काही नाही. रूपा त्याला पाणी देते
तू थोडं शांतपणे बस जरा.
हो. मॉम, तू ही थकलीस. दोघं विश्रांती घ्या. मी तुमच्यासाठी कॉफी आणते. (आत जाते)
( कृतकृत्य) लता, पोरीनं जिंकलं आपल्याला.
तुझ्या मनासारखं झालं ना.
अग आयुष्याकडून आता कसलंच मागणं नाही. सगळं कसं मस्त चाललंय.
तुझ्या आजारपणात वाईट अवस्था झाली होती माझी.
तू खूप भोगलंस. एकटयानं. पण माझी रूपावरची माया सच्ची होती. त्यामुळं तिचं मनपरिवर्तन झालं.
सुरवातीला जेव्हा मी रिक्वेस्ट केली तेव्हा काय संतापली. त्रागा केला.
आपली पोर असती तर तिनं जितकी काळजी घेतली असती तेवढं तिनं सांभाळलं.
तुझी ओढ, तळमळ सार्थकी लागली. आजकालच्या तरूण मुली म्हणजे...
हा भंगडपणा आहे. आजकालची तरूण मुलं मुली असं म्हणायचं आणि हळहळत बसायचं.
नाही अरे, मी बघते ना. खूप जणांच्या मुली अक्षरशः वाया गेल्या आहेत.
रूपा त्यातली नाही.

ते मान्यच आहे मला. असल्या चंगळवादी धकाधकीत सोन्यासारखी आहे रूपा

स्वतःचं म्हणून काही राखलं नाही तिनं किती मिसळून गेलीय या घरात. (तो खोकतो.)

रुपक । ६२ ।