पान:रुपक.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रूपा रूपा बाहेर पडलो तेव्हा माझ्या वकिल दोस्ताकडं गेलो होतो. तसा आमच्या चर्चेनंतर निर्णय कधीच झालेला होता. लता माझ्या शब्दाबाहेर नाही. आयुष्यभर सावलीसारखी राहिली. कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही तिनं. रूपा, आज आम्ही आमची सगळी संपत्ती तुझ्या नावानं केली आहे. बँकेतली रक्कम, हे घर आमचं जे जे म्हणून आहे ते सगळं तुझ्या नावे केलं आहे. (रूपाला धक्का बसतो. ती लताकडं पाहते, लता कोलमडते ) लता, लता काय झालं तुला ?

बॅप्स, मॉम ऽ ऽ

(बापूही गुंगीत जातो. त्यालाही चक्कर येऊन तो पडतो. रूपानं कॉफीतून दिलेल्या विषाचा परिणाम झालाय. दोघेही निपचित.) : बॅप्स ऽ ऽ (दोषांच्या मृतदेहांकडं पाहत फुटते आणि निश्चल होते. नजर शुन्यात आणि पडदा 1) रुपक । ६४ । समाप्त