पान:रुपक.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बापू रूपा बापू रूपा लता रूपा बापू रूपा लता बापू लता बापू लता रूपा

होय रूपा ? तुझ्याकडून आणखी आनंदाची गोष्ट कळणार आहे का ? : येस. आजच आमचं फायनल झालं.
काय फायनल झालं ?
अरे मी आणि राघू लवकरच लग्न करतोय.
छान. लवकर उडवून टाका बार !
आज सेरेमनीनंतर राघूनंच मला प्रपोज केलं. मी खूप आनंदात आहे. राघू, राघू माय लव्ह !
बेस्ट झालं. चला, मी फ्रेश होऊन येतो. आल्यापासून बसलोय नुसता बोलतच !
ओके, मीही फ्रेश होते. (ती तिच्या रूमकडं निघते)
चलो. पोरीचं आयुष्य मार्गी लागलं.
आज खरंच आनंदाचा दिवस आहे पोरीसाठी !
मलाही आनंद झाला. रूपानं लग्नाचा बेत सांगूनही तू बिथरला नाहीस.
बिथरायचं काय त्यात ! निर्णय झाला ना पक्का ! मग काय, होऊन जाऊ दे ! चल, मी येतोच.
मी ही आलेच. (दोघे आत जातात रूपा तिच्या रूममध्ये आहे. ड्रेसिंग टेबलवर काही ठेवते वगैरे. एकदा नवा मोबाईल न्याहाळते. त्याचा मुका घेते. मग आपला मोबाईल काढून राघूशी बोलायला लागते.)
हं राघू बोल. तू म्हणालास तसं केलंय सगळं. अरे, मागचे सहा महिने मी कसे काढले ते ते माझं मला ठाऊक. काय कळ काढ ? आता जास्त वेळ नको घालवायला. तुझ्या शब्दाखातर मी राहतीय इथं. हो. सगळं माझ्याकडं आहे. मी घेतलीय माहिती. आज सांगितलं मी आपण लग्न करणार आहोत म्हणून. काही नाही रे. फार काही केलं नाही त्यानं. तसं मॉमला मी मागेच सांगून ठेवलं होतं. तिचं काही नाही. मी सहा महिन्यात जी वागलीय त्यानं तिचा पक्का विश्वास बसलाय माझ्यावर. बापू तर पागलच आहे. अरे, पागल म्हणजे मी सांगेन तसं वागतो तो. पूर्वीही आणि आता तर जास्त ! संशयाचं काहीच कारण नाही. नो प्रॉब्लेम ॲट ऑल !

रुपक । ६० ।