पान:रुपक.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लता बापू लता रूपा बापू रूपा लता बापू रूपा लता रूपा लता रूपा बापू रूपा बापू रूपा लता बापू लता बापू लता

तू काहीही म्हणालीस तरी सारं श्रेय तुझंच आहे. त्याचं औषधपाणी पाहण्यापासून त्याला वेगवेगळे धडे देण्यापर्यंत सगळं तू केलंस !
रूपा, कंपनीत अॅवॉर्ड डिस्ट्रीब्युशन सेरेमनी झाला का ? : आम्हाला बोलावलं असतंस तर आलो असतो आम्ही.
अगं मला तरी कुठं ठाऊक होतं. आमची अॅन्यूअल मीटिंग झाली आणि तीत घोषणा झाली आमची.
आमची ? म्हणजे तुझ्याबरोबर आणखी कुणाला मिळालं हे अॅवॉर्ड? : आम्ही पाचजण आहोत. राघूही आहे त्यात. ॲवॉर्ड जिंकण्याची त्याची ही चौथी वेळ आहे !
खरंच गुणी मुलगा आहे.
लता, चल ते आण, आपण आताच देऊन टाकू या तिला ! : काय ? काय देणार आहेस मला ?
(पार्सल तिच्या हाती देत) बघ तूच !
(पार्सल उघडते) मोबाईल ? काय क्यूट पीस आहे. मॉम S (लताच्या गळ्यात पडते) व्हेरी ब्युटिफूल.
तुला अॅवॉर्ड मिळाल्याबद्दल हे गिफ्ट आहे.
तुम्हाला काय माहिती मला अॅवॉर्ड मिळणार आहे म्हणून. खरं सांगायचं तर माझं मलाच माहिती नव्हतं ते.
परवा तू म्हणालीस ना, हा मोबाईल सेट तुला हवा होता म्हणून. : खूप महाग आहे तो...
त्याच्याशी तुला काय करायचं आहे ? जस्ट फरगेट द प्राईस ! : (गिरकी घेते) माझ्या मनात खूप दिवसापासून होता हा पीस !

रादर पहिल्यांदा अॅड बघितली तेव्हाच ठरवलं होतं, घ्यायचा एकदा ! : रूपा, आज अगदी खूष दिसतीयस, काही विशेष ?

(हसत) हे तुझं अगदी गमतीशीर विचारणं झालं.
गमतीशीर काय आहे त्यात ?
अगं, कंपनीत मोठं अॅवॉर्ड मिळालंय तिला, शिवाय तिच्या मनातली गोष्ट मिळालीय तिला आणखी काय हवंय ?
आणखी काय हवंय ? तिचा खरा आनंद वेगळाच आहे. बघ, विचार तिला !

रुपक । ५९ ।