पान:रुपक.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लता बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू रूपा बापू रूपा लता बापू रूपा बापू लता रूपा

'सरप्राईज' असं थेट ओपन नाही करायचं. मी देते वेळेवर सगळं ! : मी म्हणत होतो आजच देऊ या तिला. परवा म्हणत होती सगळं लक्षात ठेवावं लागतं. 'ऑल इन वन' झालं तर बरं होईल. : डोण्ट वरी ! देऊ आपण तिला.
एकाच छोटया 'अॅपरेटस' मध्ये हजारो गाणी, हजारो फोन नंबर, सिनेमे, इंटरनेट ! सगळं जग खिशात घेऊन फिरणं म्हणतात त्याला. : त्यात 'व्हॉइस डायलर' आहे.
हो, म्हणजे ज्याला फोन लावायचा आहे त्याच्या नावाचा उच्चार करायचा. की थेट फोन लागतो.
म्हणजे मनात इच्छा व्यक्त करायचा अवकाश की ती व्यक्ती कानात बोलायला लागते.
चलो. हे बरं झालं. सगळी कामं मनासारखी झाली.
मागच्या सहा महिन्यात किती धावपळ, किती गडबड. रूपा आली नसती तर माझं काही खरं नव्हतं बाई !
या पोरीनं सहा महिन्यात पुनर्जन्म दिला मला !

(रूपा येते, ओरडतच...)

बॅप्स, मॉम ऽ ऽ अरे कुठं आहात ?
(पळत जाऊन तिच्या हातातील बॅग घेतो) आलो. किती ओरडतेस.

ओरडू नको तर काय ! मला तर उड्या माराव्या वाटतायत.

काही हरकत नाही. आम्हीही मारू दोन दोन उड्या तुझ्याबरोबर ! : येस ! नाहीतरी दोरीवरच्या उडया मारायला मला सांगितलंच आहे डॉक्टरांनी.

00 ओ ऽ ऽ बॅप्स हे बघ. मला व्होकेशनल अॅवॉर्ड मिळालंय कंपनीत ! 'बेस्ट एम्प्लॉई' म्हणून आमची निवड झालीय.

फॅन्टास्टिक ! बघू !
(कौतूकानं) व्वा ! खरं सांगू का रूपा, मागच्या सहा महिन्यात बापूची तब्येत ठिकाणावर आणण्याची तुझी कामगिरी गौरवास्पदच आहे.
(लटक्या रागानं) मॉम, पुस्तकी बोलू नकोस. मी काही तरी केलं का ?

रुपक । ५८ ।