पान:रुपक.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रवेश सहावा (रुपा पुन्हा राहायला आल्यानंतर सहा महिने उलटले आहेत. बापू आणि लता बाहेरून येतात. आधी बापू आणि नंतर लता.) बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू लता बापू

चला, आज बरीचशी कामं उरकली ते बरं झालं! सगळीकडं अगदी वेळेवर पोचलो. नाही तर आपण जातो. आणि खोळंबून राहावं लागतं हा अनुभव काही नवा नाही. लता, आता तू-

- (वळून पाहतो. लता अजून काही आली नाही. छे: मी एकटाच बडबडतोय.) लता ऽ लता ऽ ऽ

(आत येते) अरे काय झालं ओरडायला ?
कुठं गेली होतीस ? मी तू आहे समजून बोलतोय आपलं ! : अरे सबनीस वहिनी भेटल्या. म्हणाल्या, बापूची तब्येत ठणठणीत झालेली दिसतेय.
इतिहासजमा झाला तो आजार. उगाच नसत्या आठवणी काढू नका म्हणावं.
बरं झालं तू पुढं आलास ते. नाहीतर तुम्हा दोघांची जुंपली असती चांगली !
त्या सबनीसवहिनींना नाही उद्योग, उगाच या बंगल्यात काय

चाललंय, त्या घरात काय शिजतंय अशा चौकशा करीत बसते झालं. : तुझ्या आजारपणात त्यांची मदतही खूप झाली रे !

लता, सहा महिने झाले ना त्या आजारपणाला. तू पुन्हा उगाळू नकोस ते दुखणं !
या पोरीनं पुन्हा आणलं गाडं ताळ्यावर.
रत्न आहे ते रत्न !

तुझी तब्येत बिघडवायला आणि पुन्हा सुधारायला ते रत्नच उपयोगी पडलं ना !

गेलंय कुठं ? आजच्या आपल्या सगळया कामांच्या गडबडीत तिची वस्तू आणणं ध्यानातच नाही राहिलं........
मी आणलीय ना ?
तू ? कधी ? अग आपण बरोबर तर होतो ना सगळा वेळ 1 : तेच तर माझं 'स्किल' आहे बाबा !
ओके फाईन ! चल आण इकडं, मी तिला सरप्राईज देतो.

रुपक । ५७ ।