पान:रुपक.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लता रूपा लता रूपा लता रूपा लता

मी जाणते ते. तुझी कोणतीही गैरसोय मी होऊ देणार नाही. तुझी अडचण होऊ देणार नाही (रूपाचा फोन वाजतो, फोनवर राघू) : हं, बोल राघू ! मी ना ? इथंच आहे.
रूपा, तू बोल त्याच्याशी. मी आलेच चहा घेऊन (आत जाते.) : (हाताने नकार देते) नाही रे. तेच तेच चाललंय सगळं.

मला मुलगी मानतो तो. माझ्यामुळं अॅक्टिव्ह झाला तो वगैरे. (ऐकते) हं, हं हो ना. नर्व्हस ब्रेकडाऊन झालाय म्हणे त्याचा. नाही, आत्ता तो इथं नाहीये. अॅडमिट केलंय त्याला. हं, हं! पण आपण काय करणार त्याला. शी इज ब्लेमिंग मी. हाऊ का आय अॅक्सेप्ट दॅट ? मला इथं राहायला बोलावतीय. माझ्या सहवासात त्याची तब्येत नीट होईल म्हणे. (ऐकते) येस. राईट. काय सांगतोस ? तुझं डोकं फिरलंय का ? मी पुन्हा इथं राहायला येऊ ? अरे, एका खाईतून मी बाहेर पडले आणि तू पुन्हा मला त्यातच ढकलतोस.. बापू सुधारावा यासाठी माझा बळी ? काय संबंध ? मी का सहन करू हे सगळं ? (ऐकते) अँगल ? छे ! दुसऱ्या कुठल्या अँगलनं बघूच शकत नाही मी या प्रकाराकडं ! (ऐकते) असं कसं म्हणतोस ? नाही, मान्य आहे मला, थोडा फार फरक पडतो माणसात पण ऐकते अरे, अरे पण - तुझं हे कसलं लॉजिक आहे ? (ऐकते) आता जरा ताठ बसते हं. हो. पैसे ना ? भरपूर आहेत. नाही नो प्रॉब्लेम अॅट ऑल। (ऐकते) म्हणजे मी इथं राहायचं ! आणखी एक वर्ष ? ओके. (ऐकते) हं, तशा अटी घालता येतील. माझ्या खोलीत यायचं नाही वगैरे. (ऐकते) हं, ते ही नाही. विश्वास संपादन करायचा प्रॉब्लेमच नाही. माझ्यासाठी जीव टाकतात. ती दोघं ! (ऐकते) आपला फायदा कितीतरी मोठा होईल. नाही, अवघड काही नाही. ओ के. तुझ्या या प्रोजेक्टमध्ये दम आहे. आपली चिंता कायमची नाहीशी होईल. ओ के. भेटू आपण. बाय. ती फोन ठेवते, आता तिच्यात बदल झालाय. (ती को-ऑपरेटिव्ह मुडमध्ये) : (चहा घेऊन येते) रूपा, हा घे चहा.

(चहाचा घोट घेत) वॉव ! फक्कड झालाय अगदी.
तुझ्या स्टाईलचाच केलाय.

रूपा : वंडरफूल. आय लाईक इट ! कित्ती दिवसांनी असा मस्त चहा रुपक । ५५ ।