पान:रुपक.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रूपा लता रूपा लता रूपा लता रूपा लता रूपा लता रूपा लता रूपा

जाऊन बसतो. नीटनेटक्या ठेवलेल्या वस्तू पुन्हा नीट ठेवायला लागतो. सारखी तुझी आठवण काढतो.

(खळखळून हसते) आय सी ! म्हणजे लहान मुलं जसा धोसरा काढतात एखाद्याचा, तसा त्यानं माझा धोसरा काढलाय म्हण की. : तू काहीही म्हण. पण त्याच्या आजारावर तुझा इथला वावर, तुझं नुसतं इथं उपस्थित राहणं हाच उपाय आहे. तू नीट समजून घे. : मला गुंतवू नकोस. मी आता फसणार नाही.
तुला कोणीही फसवलेलं नाही.
तुझ्या डोळयासमोर घडल्या सगळया घटना. आणि तूच म्हणतेस असं ?
माझ्या डोळयासमोर घडल्या म्हणूनच खात्रीनं म्हणू कते मी तसं. बापूला तू ओळखलं नाहीस.
काय गरज मला नसत्या फंदात पडण्याची. मी तुम्हाला महिन्याच्या महिन्याला पे करीत होते. करत होते ना ? सगळा हिशेब चुकता केलाय.
सारखा हिशेब उपयोगाचा नाही. बापूनं तुझ्यावर मुलीसारखी माया केली. 'व्हीआरएस' नंतर त्याच्यात नवी उमेद आली तुझ्यामुळं. : मी फक्त 'पेईंग गेस्ट' होते इथं. त्या पलीकडं मला काहीही ठाऊक नाही.
मी सांगते ना. तू तुझ्या दृष्टीनं राहत होती. पण बापूमध्ये खूप फरक पडला. अगं आयुष्यात कधी पूजा - बिजा केली नाही त्यानं. पण तू आलीस आणि सगळ्या गोष्टीत इंटरेस्ट घेतला त्यानं. लहानसहान गोष्टीत तो रमायला लागला. तुझ्यामुळं तो अॅक्टिव्ह झाला. : ओके ना ! म्हणून मला पुन्हा इथं आणून तू वेठीला धरतीयस का ? : अजिबात नाही. रूपा, तू आमच्या सहजीवनात बहार आणलीस. रक्तामांसाची कुठलीच नाती नाहीत आम्हाला. तू त्या सगळ्या पलीकडं नेलंस आम्हाला. मला मूल होणं शक्य नाही हे सत्य पचवण्यासाठी तुझं इथलं अस्तित्व महत्वाचं होतं. बापू तुझ्यात गुंतलाय एक मुलगी म्हणून.

हे बघ, मला माझं आयुष्य आहे. रुपक । ५४ ।