पान:रुपक.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लता हे जे तुझं हिणवणं आहे ना, त्यानं गोत्यात येशील तू.
 स्वतःपलीकडं विचार करायला शीक. दुसऱ्याचा स्वतःसाठी वापर
 करून घेण्याची वृत्ती टाकून दे. या 'यूज ॲन्ड थ्रो' प्रवृत्तीनं पस्तावशील.
रूपा: तुझ्या म्हणण्याप्रमाणं वागलं म्हणजे 'डिसेन्ट' आणि माझ्या मनाप्रमाणं
 वागणं म्हणजे 'यूज अॅन्ड थ्रो' काय ! तुला काय वाटतं?
 तुझ्या या बोलण्याचा अर्थ मला कळत नाही ? मला जाणून बुजून
 डिवचण्याचा प्रकार करतीयस तू.
लता : तुला डिवचणारी मी कोण ?
रूपा : तेच मला म्हणायंच आहे. कोण तू ? कशासाठी माझ्यामागं हा
 तगादा लावलास? मी काय तुझं देणं लागते ?
लता : हेच ! 'देणं घेणं' या असल्या विचारापुढं जाण्याची तुझी
 कुवतच नाही.
रूपा : माझी कुवत तपासून घेण्यासाठी मी इथं आले नाही.
लता : रूपा, तुझ्या वर्तनानं एका कुटुंबाची वाताहत होतीय हे मला
 सुनवायचंय तुला. बापू तिकडं हॉस्पिटलात एकटा आहे. नर्सवर सोपवून
 आलीय मी त्याला.
रूपा : आय डोण्ट केअर !
लता : (मघाचा कणखर स्वर हळूहळू बदलतोय) रूपा, बापूच्या
 आजारपणावर कसलंही औषध नाही. डॉक्टरांशी माझी प्रदीर्घ चर्चा झाली.
रूपा : ती आता मला सांगत बसू नकोस.
लता : तुझा सहवास हाच त्याच्यावरचा प्रभावी उपचार आहे, असं
 डॉक्टरांनी सांगितलंय.
रूपा : इम्पॉसिबल ! बापूसारख्या माणसाच्या सहवासात मी एक क्षणही
 राहू शकणार नाही.
लता : ऐक तरी. तुझा काही तरी गैरसमज झालाय.
रूपा : मखलाशी करू नकोस. बी प्रॅक्टिकल.
लता: तू त्याच्यावर रागावून निघून गेल्यापासून त्याची तब्येत बिघडली.
 त्याच्या खाण्यापिण्यावर परिणाम झालाय.तो सतत तुझ्या रूममध्ये


रुपक । ५३ ।