पान:रुपक.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रवेश पाचवा

(स्थळ तेच नव्र्व्हस ब्रेकडाऊनच्या अॅटॅकमुळे बापूला दवाखान्यात अॅडमिट केलं
आहे. लता आणि रूपा बाहेरून येतात.)
लता : ये, रूपा ! (रूपा घर न्याहाळते, सावकाश येते) बस ना रूपा !
रूपा : (उभीच) मला वेळ नाही, पटकन सांग काय सांगायचं ते.
लता : रूपा, अगं बस तरी. चहा करू का फक्कड ! अगदी तुझ्या स्टाईलचा !
रूपा  : नको, बोल तू.
लता : बापू घरी नाहीये.
रूपा ते तर तू येतानाच सांगितलंस. तो नाहीये म्हणूनच मी आले.
लता : तसं नाही, त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय.
रूपा  : (बेफिकिरीनं) का बरं ?
लता : नर्व्हस ब्रेकडाऊन झाला त्याचा.
रूपा : हैं.
लता : आतल्या आत किती गोष्टी दडवत होता कुणास ठाऊक. त्या
 सगळ्याचा उद्रेक झाला.
रूपा :आतलं आणि बाहेरचं ! हं !
रूपा  : मग ? मी काय करू ?
लता : यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट !
रूपा : डोण्ट टॉक लाईक अ फूल ! तुम्ही नवऱ्याच्या ताटाखालचं मांजर
 असणाऱ्या बायका असंच म्हणणार. त्याच्या आजारपणाशी माझा
 काहीही संबंध नाही. ओ. के.? तुझं बोलणं झालं असेल तर मी निघते.
लता तुला थांबावं वाटणारच नाही ग ! पळूनच जावंसं वाटेल.
रूपा  : कशासाठी ? कशासाठी पळून जावं वाटेल ?
लता आपल्यामुळं एखाद्याचं आयुष्य बिघडतंय ही जाणीव तुला पोखरतेय.
रूपा  : हॅट ऽ ऽ मला दुसऱ्याशी काही देणंघेणं नाही. माझं लाईफ
 मी घडवतेय.
लता : थिंक ब्रॉड रूपा. असल्या उंडग्या आणि उठवळ धडपडीनं काही
 घडत नसतं.
रूपा : तुझ्या सल्ल्याची आणि गाईडन्सची मला गरज नाही. ऑर्थोडॉक्स !


रुपक । ५२ ।