पान:रुपक.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




लता: बापू ऽ ऽ
बापू: (रिमोटनं टीव्ही सुरू करतो. तोडांनं गुणगुणणं सुरूच )
 If you Call me.......
लता: बापू, काय चाललंय तुझं ?
 (त्याच्या हातातील रिमोट घेऊन टीव्ही बंद करते..)
बापू: (ओरडतो) अगं अगं आपल्या रूपासारखंच कुणीतरी दिसतंय. रूपा,
 रूपा ऽ ऽ (तिच्या हातातील रिमोट घेऊन पुन्हा सुरू करतो. तोंडानं
 गाणं सुरू आहे. त्याचं काल्पनिक रूपाशी बोलणं सुरू होतं.
 टीव्हीवर कसलं गाणं, त्याचं पुटपुटणं आणि लताच्या त्याला
 सावरण्यासाठी हाका)
लता: बापू ऽ, बापू 5
 (बापू तिच्याकडं अनोळखी नजरेनं पाहू लागतो. आणि अंधार )




प्रवेश चौथा समाप्त









रुपक । ५१ ।