पान:रुपक.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बापू: तुला कळत कसं नाही. का अकलेचा भुगा झालाय तुझ्या ?
लता: हे बघ बापू, रूपावरून तू माझ्याशीही अरेरावी करायला लागलास !
बापू: अरेरावी ? मी काय केलं तुला ?
लता: मी काही सांगतीय तुला त्याला काही किंमत आहे की नाही ?
बापू: असं कसं म्हणतेस ? तुझ्यासाठी तर केलं ना सगळं !
लता: मग मी सांगते तसं कर आता !
बापू: काय ?
लता: आपण पुन्हा जाहिरात देऊ. आपल्याला चांगली वाटेल अशी
 कुणीही मुलगी 'पेईंग गेस्ट' म्हणून सांभाळू !
बापू: शक्य नाही ते. लता, तू मला तेच तेच पुन्हा पुन्हा सांगू नकोस.
 उद्या एखादी मुलगी दत्तक घेऊ. तिला वाढवू असंही म्हणशील.
 या सगळ्या पर्यायांवर आपण विचार केलेला आहे. त्यातूनच
 'पेईंग गेस्ट' ची आयडिया निघाली. रूपा त्यातूनच भेटली ना ?
लता: तोच पर्याय पुन्हा करायचा ! कुठली तरी मुलगी आपली
 म्हणून दत्तक घ्यायची आणि तिच्याशी आपलं पटेनासं झालं की
 सगळंच कठीण होणार, त्यापेक्षा 'पेईंग गेस्ट' बरी !
बापू: मला रूपाच्या ठिकाणी दुसरं कुणाला बघवत नाही.
लता : अरे अलिप्त राहायचं. तिच्या तिच्या वेळा, तिची नोकरी
 ती सांभाळेल. आपण आपल्या कामात राहायचं
बापू : असलं दुभंगलेपण मला मान्य नाही. तू नव्या 'पेईंग गेस्ट'चा
 विचार सोडून दे !
लता: मग तू रूपाचा विचार करणं सोडून दे !
बापू: शक्य नाही ते.
लता: मला हे असहय होतंय.
बापू: आय एम हेल्पलेस !
लता: अरे पण--
बापू : रूपाची आठवण होतेय
 If You Call me, If You Call me
 I will Come,
 Swifter, O My Love
 If you Call me I will come
 Swifter than desire


रुपक । ५० ।