पान:रुपक.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लता:बापू, तुझ्या प्रत्येक हालचाली मला ठाऊक आहेत. तू पवित्र आहेस.
 तुझ्या स्पर्शातली आश्वासकता मी हरघडी अनुभवली आहे.
 अपघातानंतर मला दवाखान्यात राहावं लागलं तेव्हा तू ज्या मायेनं
 मला हवं नको पाहात होतास, त्या तुझ्या कृतीतला सच्चेपणा मला
 बळ देत होता. आपण कुणाला तरी हवे हवेसे वाटतो या जाणिवेनं
 जगणं सुसहय होतं. तेव्हाच्या तुझ्या स्पर्शातील व्याकुळता, आश्वासन,
 धीर हे सगळं माझ्या मनात आजही ताजं आहे. भलेही
 २५ वर्षे उलटून गेली असतील त्याला.
बापू:रूपा तशीच गेली असती तर चाललं असतं एक वेळ
लता: बापू, रूपाला तू किती तन्हांनी जपत होतास. तिच्या आईला त्याची
 खात्री होती म्हणूनच तिनं आपल्याकडं राहायला परवानगी दिली ना.
बापू: आयुष्यानं प्रत्येक आनंदाच्या उत्कटक्षणी मला हरवलं आहे, पराभूत
 केलं आहे लता ! तू आई होणार असल्याचा आनंद माझ्याकडून
 कायमचा हिरावला गेला. आणि ते मातृत्वाचं सुख रूपाच्या निमित्तानं
 लाभावं म्हणून किती प्रयत्न करत होतो. नाही शक्य झालं ते.
 आज पैसा आहे, सगळ्या सुखसोयी आहेत. भरभरून मिळालंय सगळं.
 या पोरीनं माझ्या वात्सल्याची आर्तता जाणली नाही. किती स्वच्छंदी होती ती.
लता: बापू, तुला जसं मी जाणते तशी परिस्थितीही पाहतीय मी. ही तरूण
 पोरं-पोरी दुसऱ्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. कुणीतरी आपल्याला
 फसवेल ही भीती कायम त्यांच्या मनात घर करून असते. त्याच्यातून
 त्यांचा स्वतःवरचाही विश्वास उडतो. आपल्या जीवाभावाच्या माणसांनाही
 जुमानत नाहीत ती. त्यातून रूपासारख्या मुलीनं बापाचा स्पर्शही कधी
 अनुभवलेला नाही.
बापू: लता...
लता: थांब बापू. झालं गेलं विसरून जा असं मी म्हणणार नाही, पण
बापू: रूपाला मी विसरणंच शक्य नाही लता. तिच्या आठवणी माझ्या
 दिवसाच्या हरेक प्रहरांशी निगडीत आहेत. सकाळी उठल्यापासून
 दिवसाच्या अखेरपर्यंत रूपाशी मी बांधलो गेलो होतो.
लता: माझ्याशिवाय ते कुणाला माहिती असणार ? आता आलेली
 परिस्थिती नाकारता तर येणार नाही... -


रुपक । ४८ ।