पान:रुपक.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लता: (बापूला) ती नाही रे ऐकणार कुणाचंही. हेकट आहे पोरगी.
रूपा : (फोनवर) हेकटपणा मी नाही, तू करतोयस राघू. मी माझ्यावर
 गुदरलेल्या प्रसंगाचं एवढं तुला सांगतीय आणि तू तिथंच राहायला फोर्स करतोयस..
लता: (बापूला) तू तिला फोर्स करू नकोस.
रूपा : माणसांच्या चांगुलपणाचा हवाला तू असा फोनवरून; उंटावरून
 शेळ्या हाकल्यासारखा देऊ नकोस.
बापू : वरवरच्या गोष्टीवरून अंदाज बांधण्यात मुर्खपणाच होतो बऱ्याचदा .
रूपा : फोनवर उसळून मुर्खपणा काय यात ? तुझ्याशी इतका वेळ
 बोलतीय तोच मुर्खपणा ठरलाय माझा. तू कधी येतोयस ते सांग.
  जमलं तर ये, नाही तर ऑफिसात भेटू. बाय. (फोन ठेवते. बॅग घेऊन बाहेर येते.)
रूपा: (लताला) ओ के गुडबाय.
 (लता काही बोलणार तोच बापू पुढे होतो)
बापू: रूपा, पोरी माझं ऐक.
रूपा: (त्याच्याकडं न बघता ) काही ऐकायचं नाही मला.
बापू: तू आता रागात आहेस आणि रागारागानं कोणताही निर्णय घेऊ नये.
 पश्चातापाची पाळी येते.
रूपा: पश्चाताप आताच होतोय मला.
बापू: हे बघ रूपा. माझ्याकडून काही चूक झाली असेल अनवधानाने तर
 माफ कर मला. तुझं असं तडकाफडकी सोडून जाणं मला पसंत नाही.
 मी आणि लतानं तुझ्यावर आई-बापासारखं प्रेम केलं.
 आम्हाला मुलबाळ नाही म्हणून कधी खंतावलो नाहीत आम्ही तू
 इथं आल्यापासून. तुझ्यात मी माझी मुलगी पाहत होतो. तुझा
 डॅशिंगपणा, धाडस, फटाक्कन निर्णय घेण्याची तुझी स्टाईल,
 सगळं मला आवडत होतं, आवडतं. बाहेरच्या जगात किंवा
 ऑफिसात चुकीचे असले तरी ते तुझे निर्णय होते. पण इथला
 तुझा निर्णय चुकतोय. यापुढं मी तुला आवडेल असंच वागेन.
 तू नकोस जाऊ इथून. अगं, आमच्याकडं सगळं आहे.
 या घरात कशाचीही कमतरता नाही. पैसा, दौलत सगळं आहे.
 पण इवली इवली अडखळती.


रुपक । ४१ ।