पान:रुपक.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





 पावलं या घरात धावली नाहीत. तुझ्यामुळं आम्ही तो अनुभव घेत होती.
 रूपा, एरवी 'पेईंग गेस्ट' ठेवून पैसे कमवावेत अशी आमची
 कधीच इच्छा नव्हती. तुझ्यासारखी उमदी पोर इथं राहिली तर
 तेवढाच जीवाला दिलासा !
 (रूपा हे सगळं निलाजऱ्या कडवेपणानं ऐकतीय. लता बापूच्या
 विनवणीनं स्तंभित झालेली.)
रूपा: तुझं बोलणं झालं असेल तर मी पळते. आणि झालं नसलं तरी मला
 त्याच्याशी आता देणंघेणं नाही बाय.


(रूपा निघून जाते. ती गेल्याच्या दिशेला बघत बापू फुटतो.
लता त्याला सावरते आणि इथंच पडदा)




-अंक पहिला समाप्त-













रुपक । ४२ ।