पान:रुपक.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 पचवणारी विषकन्या जशी असते, तशी ही रूपा आहे.
 पुरुषाबद्दल तिच्या मनातलं रूपक वेगळंच आहे.
बापू: अजिबात नाही. तू उगाच मोठमोठया गोष्टी सांगू नकोस.
 काही होणार नाही तसं.
लता: काहीही झालं. तरी मी तुझ्याबरोबर आहे. तुझ्यावर एवढा आघात
 करूनही तू तिला पुन्हा सामावू पाहतोस. आय एम विथ यू !
बापू: हा काही लढा नाही लता. सगळ्या जगावरचा विश्वास उडून गेला
 तर तिच्या वाट्याला कसलं जगणं येईल कल्पनाच करवत नाही.
 (इतक्यात रूपा टॅक्सी घेऊन येते. दोघांकडं न पाहता ती तिच्या
 रूमकडं जाते. तिचा मोबाईल वाजतो. फोनवर राघू ......)
रूपा:राघू बोल. हं, मी निघतीय. टॅक्सी आणलीय. (बाहेर बापू
 आणि लता बोलतायत )
बापू: टॅक्सी परत पाठवून द्यायला हवी.
 (आत रूपा आणि बाहेर बापू अनुक्रमे राघू व लताशी बोलतायत)
रूपा:फोनवर रात्रूला आता फेरविचार नाही, मी निर्णय घेतलाय.
बापू: तिला निर्णय बदलायला लावू.
रूपा: हो, तीन वर्ष काढली मी इथं. त्या तीन वर्षात वेळोवेळी जे झालं,
 त्याचा आता कडेलोट होतोय.
बापू:इथून बाहेरच्या जगात जाणं म्हणजे कडेलोट ठरेल तिचा.
रूपा: (फोनवर ) नाही. कुठंही जागा घेतली नाही. कंपनीच्या रेस्ट हाऊसवर
 जातीय आता.
बापू:अचानक चाललीय. कुठं जाऊन उतरेल. ती माणसं कशी असतील ?
रूपा:(फोनवर) आठवडाभरात दुसरी जागा मिळेल. तेवढ्यापुरतं
रेस्टहाऊस
 चालेल. आणि तू काय नुसता फोनवरच बोलणार आहेस का ?
 भेटणार नाहीस ?
बापू:राघूला तरी निदान समजावून सांगायला पाहिजे. त्या दोघांची भेट
 होईलच की.
रूपा: फोनवर तू मला हेच समजावणार असशील तर भेटूच नकोस.
 निदान दुसरी जागा मिळेपर्यंत तरी.

रुपक । ४० ।