पान:रुपक.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बापू : या आपल्या पर्सनल गोष्टी आहेत लता. मी काही फार मोठा त्याग
 केला वगैरे सांगून तू मला 'त्यागमूर्ती' बनवू नकोस.
लता : माझ्यामुळं तुला बाप बनता आलं नाही. ती तुझी भूक रूपाच्या
 सहवासातून भागत होती, तर त्या पोरीचं डोकंच विपरित
बापू: नाही लता, आपण तिला समजून घेतलं पाहिजे. ती मघाशी जे
 बोलली ते उथळ नव्हतं. तिच्या वयाच्या मुलींनी बोलावं इतकं
 पातळ नव्हतं. त्या बोलण्यात दुःखाच्या छटा होत्या.
 सहन केल्याच्या खुणा होत्या. मला वाटतं, आता तिला बापाची
 गरज आहे, आईची गरज आहे.
लता:मग काय करायचं ठरवलं आहेस तू ? अरे, अशा बिनदिक्कत
 आरोप करणाऱ्या पोरी कोणत्याही थराला जाऊ शकतात.
 आज नुसतं तोंडावर बोलून ती गेली. उद्या पोलिसात तक्रार देऊन
 नाचक्की करायला कमी करणार नाही ती.
बापू : लता, रूपा तशी नाही. आजवरच्या सगळ्या साचलेपणाचा स्फोट
 केला तिनं रूपाला सांभाळायला हवं. आपण तिला थांबवू या.
लता : (चिडते) कसं थांबवतोस ? हो, माझ्याकडून चूक झाली म्हणून
 नाक रगडतोस का तिच्यासमोर.
बापू :असं करायची गरज नाही.
लता : : मग थांबवणार कसा तिला ? तुझ्या निष्कपट वागण्याचा, तुझ्या
 पितृतुल्य स्पर्शाचा वेगळाच अर्थ लावलाय तिनं जितक्या लवकर
 ती इथून जाईल तितकं बरं !
बापू: दुसरं कुणी असतं तर मी तुझं म्हणणं मान्य केलं असतं. रूपा
 अजाण आहे. जगाचा एकतर्फी अनुभव तिनं घेतलाय. चांगली
 माणसंही इथं आहेत याची जाणीव तिला व्हायला हवी.
लता :  : चुकीचं बोलतोयस तू. तिच्या भोवतालच्या जगानं तिला
 कडवटपणाच दिलाय.लहानपणापासून प्रेमाची वासनेच्या रूपातून भेट
 झालीय तिची. त्यामुळं मोठ्या माणसांचा मानमरातब, त्यांचा
 आदर - सन्मान काही माहिती नाही तिला. मतलबी झालीय ती.
बापू: सावरण्याची हीच वेळ आहे. चांगुलपणाचा प्रत्यय तिला देण्याची
 आपण तयारी ठेवली आहे.
लता : बापू, लोककथेतल्या गोष्टीत लहानपणापासून विषाचा कण कण

रुपक । ३९ ।