पान:रुपक.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 भाव मला कळला नाही, असं समजू नकोस. मी तुला मूल नाही
 देऊ शकले पण दैवयोगानं ही पोर चालत आपल्या घरी आली,
 त्यातलं सौहार्द मी खरं मानलं. आपली स्वत:ची पोर असल्यागत
 तू वागत होतास तिच्याशी त्या सलगीत माया दाटलेली होती है
 माझ्याशिवाय अन्य कुणाला कसं कळणार ?
बापू : आणखी काहीही म्हटलं असतं तिनं, चार शिव्या घातल्या असत्या
 तरी मी सहन केलं असतं..
लता: फख आतून किडकं आहे हे समजायला वेळ जातोच.
बापू: नाही लता, असं कसं म्हणतेस ? या मोठया शहरात स्वतःच्या बळावर
 ती एकटी उभी राहिली. तिची हुशारी, बुध्दिमत्ता या सगळ्या गोष्टी
 नाकारता कशा येतील ?
लता: आपल्या परक्यातला भेद कळत नाही ती हुशारी काय कामाची ?
बापू: (मनाशी काही ठरवून) लता, माझ्या मनात पाप नव्हतं आणि नाही
 हे तुला माहिती आणि मलाही ! तरीही रूपाला असं वाटावं यात
 तिच्या मनाचा खेळच कारणीभूत आहे.
लता: म्हणजे ? काय म्हणायचंय तुला ?
बापू: निकोप मनानं आपण तिच्याशी वागत होतो, कोणताही आडपडदा न
 ठेवता. तिनं मात्र त्याचा वेगळाच अर्थ काढला. याचा अर्थ तिच्या
 मनावर पुरूषांच्या वागण्याचा विपरित परिणाम झाला आहे.
लता: घरदार सोडून बाहेर शिकायला राहायचं तर कडू गोड अनुभव येणारच.
बापू: एक्झॅक्टली. रूपाच्या मनावर त्याचाच परिणाम स्पष्ट दिसतोय.
 मला वाटतं, ही तिला सावरण्याची वेळ आहे.
लता : इतकं तिनं बोलूनही तू असा विचार करू शकतोसच कसा ?
बापू : ती काळाची गरज आहे. रूपाच्या बोलण्यानं, आरोप करण्यानं मी
 हादरून गेलो पुरता. पण तिच्या बोलण्यामागचा कंद तिच्या
 अनुभवातून पिकला आहे.
लता: बापू, तुझी विचार करण्याची पध्दतच समजली नाही मला. मुलाचा
 चान्स घेतला तर माझ्या जीवाला धोका आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं
 तर तू स्वतःची नसबंदी करून घेतलीस.


रुपक । ३८ ।