पान:रुपक.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 मलाच माझा स्पर्श अनोळखी होऊन जातो. काय हे बापुडवाणं
 तरीही भणभण करणारं दुःख माझ्या कातडीशी झोंबतंय. माझ्या
 एकाकीपणाचे, एकटेपणाचे असहय हुंकार या झोंबऱ्या आणि
 सलणाऱ्या जाणिवांनी, का मी साहत राहायचे. हे सगळं मला असहय
 होतंय. तुम्ही मला प्रेम दिलंही असेल, परंतु त्यातील दाशुध्दता
 तपासण्याचं भान माझ्या सालटीच्या आत घुसू नाही शकलं.
 नको मला हा सहनशीलतेचा त्रास. मी हे घर सोडतीय. मॉम, मी
 तुला त्रास दिला असेल तर माफ कर मला. टॅक्सी घेऊन येतेय मी.
 (बापूकडं न पाहता निघून जाते. बापू हे सगळं ऐकत 'कोलॅप्स' होण्याच्या स्थितीत )
लता : बापू ऽ ऽ (ती बापूच्या पाठीवर ठेवते, बापू तिच्या कमरेला मिठी
 मारून ढसढसा रडतोय.)
बापू : लता, काय झालं हे ?
लता: (डोळ्यातलं पाणी आवरून कणखरपणे) बापू, तुझा काहीही दोष
 नाही, मला चांगलं ठाऊक आहे ते..
बापू: प्रत्यक्ष बायकोसमोर माझ्यावर लंपटपणाचा आरोप केला रूपानं.
लता : शरम वाटावी असं काहीही केलेलं नाहीस तू.
बापू: हे तू म्हणतेस. त्या कालच्या पोरीनं मला असं सुनवावं ?
लता : असली अपत्यं होण्यापेक्षा आपण निपुत्रिक आहोत तेच बरं वाटतं मला.
बापू : (पॉज) रूपाला मी स्वतःची मुलगी समजून वागत होतो.
 आपल्याला न होणाऱ्या अपत्यसंभवाचं दुःख तिच्या सहवासात मी विसरत होतो.
लता: मला चांगलं माहिती आहे ते. म्हणूनच तुझ्या बरोबरीनं तिच्या
 संगोपनात मी सहभागी होत होते. काही काही लपवून ठेवलं नाही
 तिच्यापासून. आपल्या बँक बॅलन्सपासून नातेवाईकांच्या अभावापर्यंत
 सगळं तिला वेळोवेळी सांगितलं.
बापू: रूपामुळं या घराला घरपण आलं होतं. तिच्यामुळं माझ्यात चैतन्य
 निर्माण झालं होतं.
लता: बापू, मी असतानाही तू 'रूपा - रूपा' करत होतास, त्यातला तुझा


रुपक । ३७ ।