पान:रुपक.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रूपा: तेच म्हणतीय मी. माझं वय काय, त्याचं काय ? पण नाही
 त्याचीही तमा नाहीये त्याला.
बापू: रूपा, मला समजतच नाहीये तुझं बोलणं !
रूपा : मखलाशी करतोस ? आता अकांडतांडव करशील, माझा हेतू तसा
 नाही वगैरे बरळशील. मला ते ऐकायचं नाहीये.
लता: रूपा, डोकं फिरलंय का तुझं ?
रूपा: माझं नाही, या बापूचं फिरलंय. त्याच्या या किळसवाण्या प्रकारामुळं
 मी जाणीवपूर्वक अंतर राखलं. कधी तुमच्या जवळ आले नाही.
 माझ्या पर्सनल गोष्टी उगाळत नाही बसले. साध्या गोष्टींचा आनंद
 कधी घेऊ दिला नाही मला. मी डान्स करायला लागले तर आला
 हा ही. मी पडले, एवढं मला लागलं, तर यानं माझ्या सगळ्या
 अवयवांना चाचपून बघितलं. शी : आठवलं तरी हजार झुरळं
 अंगावर एकदम चढल्यासारखी वाटतात. मी पेईंग गेस्ट असले
 तरी आश्रित नाही तुमची.
बापू: (पॉज, धक्का बसलाय ) आय कान्ट बेअर घिस ! रूपा, पेईंग गेस्ट
 नाही, मुलगी समजतोय मी तुला माझी.
रूपा: बस कर आता हे मुलामे देण्याचं नाटक.
लता: नाटक कसलं रूपा ? तुझं डोकं ठिकाणावर आहे का ?
 तुला पेईंग गेस्टसारखं आणि आश्रितासारखं तरी कधी वागवलं
 गं आम्ही ? सतत तुझी चिंता, काळजी वाहिली आम्ही
रूपा: बेगडीपणा आहे हा. महिन्याच्या महिन्याला ठरलेले पैसे देत होते ना
 मी ? मग फक्त त्याची चिंता करायची. माझी काळजी घ्यायला मी
 समर्थ आहे.
बापू: कधी तुझ्याकडे पैशाची मागणी तरी केली का आम्ही ?
लता: बापाविना वाढलेली पोर म्हणून किती माया करतोय तुझ्यावर !
रूपा: माया ? हरेक घडीला माझ्या शरीराला स्पर्श, काही बोलायचं तर
 अंगाला हात लावून ? ही बापाची माया ?
लता: पुरुषाचा स्पर्श केवळ एकाच भावनेनं होत नसतो--
रूपा : पुरे झालं. मी तुला आईसारखी समजून मॉम म्हणत होते.
 तुझ्यात मला माझी आई दिसते. माझ्या खऱ्या बापाला तर मी

रुपक । ३५ ।