पान:रुपक.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 शेअरचा फायदा ! आपण दोघेही ऑलरेडी कोट्यधीश आहोत,
 आयुष्यभर कष्ट केले, आता मस्त मजा करू या ना !
बापू : व्हाय नॉट ! तू लाग तयारीला.
 (रूपा फोनवर बोलत येते. बहुधा रात्रूशीच )
रूपा: (फोनवर ) तू असं कसं म्हणतोस? हाऊ इज इट पॉसिबल ? मला
 एकेक क्षण नकोसा वाटतोय वूई मस्ट टेक सम डिसिजन ऑन
 धिस मॅटर. (दोघांकडे कटाक्ष टाकून स्वतःच्या रूममध्ये जाते)
 ओ के फाईन. मी फायनल करून टाकते सगळं, रादर आधीच
 डिसिजन घेतलाय. राईट, आय विल रिंग यू आफ्टर सम टाइम.
 (फोन ठेवते तिनं बॅग वगैरे आवरून ठेवलीय, बाहेर येत )
 फाईन, तुम्ही दोघंही इथं आहात ते बरं झालं !
लता : आम्ही कुठं जाणार ? दोघंच ?
रूपा : (गांभिर्याने) मला तुम्हाला काही सांगायचंय !
बापू : ते सांग सावकाशीनं. आधी माझं ऐक
रूपा : बॅप्स ऽ ऽ
बापू : रूपा, रूपा ऽऽ (तिला धरून फिरवतो) अग, सेन्सेक्स वाढल्यामुळं
 काल माझ्या अर्कोटवर ४० लाख जमा झाले. आहे की नाही गुड
 न्यूज !! (तो तिला फिरवतोय)
रूपा: (त्याला झिडकारत) सोड, सोड मला.
लता: (अवाक्) रूपा ? काय झालं
रूपा : काय झालं म्हणून काय विचारतेस ? हा सारखा माझ्या अंगचटीला
 येतो. मला नाही आवडत ते!
बापू: रूपा, काय बोलतेस तू हे ?
रूपा: उबग आलाय मला त्याचा. साध्या साध्या गोटी सांगताना, बोलताना
 सतत मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोस. डिस्गस्टिंग !
लता: काहीही बोलू नकोस रूपा, आधी माफी माग त्याची.
रूपा: माफी ? माय फूट ! आजवर सहन केलं खूप. सुरवातीला दुर्लक्ष
 केलं मी. नंतर जसं लक्षात आलं तसं नोट केलं एकदा, दोनदा,
 तीनदा ! सारखा माझ्या अंगाला हात लावतो.
लता: अग तुझं वय काय, बापूचं काय--

रुपक । ३४ ।