पान:रुपक.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रवेश तिसरा
( स्थळ तेच : मागच्या घटनेनंतर, काही दिवस उलटलेले. बापू बाहेरून येतो.
अतिशय आनंदात )
बापू: लता, लता ऽ ऽ
लता : (बाहेर येत) अरे हो हो, किती मोठ्यानं हाका घालतोस ?
बापू : लता, गुड न्यूज आहे !
लता : वॉव, बोलिए जनाब !
बापू : आपल्या डी मॅट अकौंटला ४० लाख रूपये जमा झालेयत.
लता : काय सांगतोस ?
बापू : येस. रिलायन्सच्या शेअर्सची कमाल आहे. एका रात्रीत सेन्सेक्स
 वाढला आणि आपला बॅलन्सही !
लता : क्या बात है ! ए 5 पुढच्या महिन्यात दक्षिण भारतात जायचं का
 ट्रीपला ?
बापू : छान ! अर्कोटवरून पैसे काढायच्या आत तुझे मनसुबे सुरू झाले का ?
लता : खूप दिवसापास्नं माझ्या मनात होतं साऊथ इंडियाची टूर करावी म्हणून.
बापू : यातली काही रक्कम पुन्हा दुसऱ्या कंपनीत गुंतवावी असा
 विचार आहे माझा.
लता : ते तू कर काय करायचं ते. पण माझ्यासाठी 'साऊथ' च्या टूरचा
 बंदोबस्त कर !
बापू : ते होईल ग !
लता : कन्याकुमारी, केरळ, उटी, म्हैसूर-बंगलोर अशी लांबलचक
 टूर काढायचीय मला.
बापू : मागच्यावेळी सगळा उत्तर भारत पालथा घातला ना आपण.
 माझं टूरचं प्लानिंग किती परफेक्ट असतं हे तुला माहितीय.
लता: तेच आता 'साऊथ' साठी कर.
बापू : हो. आधी आपल्याला या रकमेची सिक्युअर्ड इन्व्हेस्टमेंट
 करायची आहे.
लता: बापू, तू आणखी पैशाच्या मागं लागू नको. माझे पी एफचे पैसे,
 तुझेही पी एफ, ग्रॅच्युइटीचे पैसे दुप्पट झाले आहेत. त्यात हा



रुपक । ३३ ।