पान:रुपक.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रूपा : हॅलो, राघू. मी येऊ शकत नाही रे. मी पडलीय. मला बोलतानाही
 त्रास होतोय. आय एम सॉरी (बापू - लता तिचा विरस झाल्याचं पाहून
 खंतावतात) काय ? तू येतोयस? नको. पार्टीला सगळे जमले
 असतील ना ! त्यांना सोडून नको येऊस. राघू ऽऽ, मला तरी कुठं
 बरं वाटतंय. आय एम आल्सो फेडअप ! मला त्रास होतोय राघू.
 बट नो नीड टू कॅन्सल द पार्टी. बॉस येणार आहेत. इट विल
 बी हेल्पफूल फॉर अवर फ्युचर. (ऐकून) ओके. आय विल ट्राय. (फोन ठेवते)
लता  : रूपा, तुला चालता येणार नाही. तू रेस्ट घे. (रूपा कण्हते.)
बापू बेटा, काय होतंय
रूपा : (तो जवळ येतोय हे पाहून) तू माझ्या अंगाला हात लावू नकोस..
बापू : अग पण -
रूपा : डोण्ट टच मी.

(पुन्हा राहूचा फोन येतो. ती फोन घेण्यासाठी उठते. उभी राहून बोलायला लागते. पण तोल जाऊन कोसळते. बापू-लता तिला आवरतात आणि अंधार)


     प्रवेश दुसरा समाप्त











रुपक । ३२ ।