पान:रुपक.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 गरज भासते ती धुंदीत तेव्हा बापू तिला जॉईन होतो. सुरूवात
 साधेपणानं होते, नंतर नृत्यातूनच जवळीक वाढते.
 नृत्याची लय वाढत जाते,तसा बापू तिच्या कमरेला हात लावतो.ती ताङ्कन तो
 बाजूला सारते आणि ओरडते...) स्टॉप दॅट.
बापू  : (दचकतो) काय झालं ?
रूपा  : काय झालं म्हणून मला काय विचारतोस ? (लता दरम्यानच्या
 काळात सीडीप्लेअर ऑफ करते. रूपा संतापून आत जाते.)
बापू  : खरंच काय झालं ते मला नाही कळलं?
लता  : चांगली हसत खेळत नाचत होती. अचानक काय झालं पोरीला
 कुणास ठाऊक ?
बापू  : तू काही अॅडव्हर्स रिमार्क दिलास का बघता बघता ?
लता  : छे, मी कशाला काही रिमार्क देतेय. या तरूण मुलींचं असंच असतं.
 घटकेत एक मूड तर घटकेत दुसराच !
बापू  : ते ठीक आहे, परंतु आताचं तिचं जाणं मला झिडकारणारं वाटलं.
 त्वेष होता तिच्यात.
लता  : कदाचित राघूसाठी बसवलेल्या डान्समध्ये तू घुसलास हे आवडलं
 नसावं तिला.
बापू : अग पण पार्टनरची जिथं गरज आहे, नेमक्या त्या वेळेला मी तिला
 जॉईन झालो. नाही तर डान्स अर्धवट राहिला असता.
लता : आता तरी कुठं पूर्ण झाला म्हणायचा ?
बापू : शी : पोरीचा मूड गेला.
लता : काही नाही रे ! तू उगीच हळहळत बसू नकोस.
बापू  : तिच्या स्पेशल माणसाचा वाढदिवस आहे, त्यासाठी तिची तयारी
  चालली आहे. हैं : s s
लता : डान्स मात्र झक्क बसवलाय तिनं, कुठं शिकून येते कुणास ठाऊक.
 आजकालच्या मुलींना काही शिकवावंही लागत नाही म्हणा.......
 (रूपा आतमध्ये तणतणत आवराआवर करीत आहे. पार्टीसाठी
 जाण्याचा पोशाख तिनं घातला आहे. पार्टी मॅजिक पाईपशी ती काही
 झटापट करतीय. मध्येच काहीतरी आठवल्यानं तिनं पलंगावर किंवा
 टेबलावर चढून काठीनं काही काढायचा प्रयत्न केलाय. तिच्या

रुपक । ३० ।