पान:रुपक.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




 If you call me I will come
 Swifter than desire,
 Swifter than the lightning's feet
 Shod with plumes of fire.
 Life's dark tide may roll between,
 Or death's deep chasrns divide
 If you call me I will come
 Fearless what betide.

बापू : छान ! मस्तच आहे ग कविता. 'तू फक्त हाक मार,मी मनाच्या
 वेगापेक्षा अधिक गतीनं पोचेन'. खूप तरल शब्द आहेत.
लता : रूपा, तुला सोनं सापडलंय, जपून ठेव बाई !
रूपा : मॉम, मॅरेज अॅनिव्हर्सरीच्या सिल्व्हर ज्युबिलीला नवऱ्याला एकानं
 प्रश्न केला, तुमच्या सुखी जीवनाचं रहस्य काय, तर तो म्हणाला,
 'माझ्या पात्रतेप्रमाणं बायको मला मिळालीय!' हे वाक्य मी कायम
 मनाशी ठेवलं !
लता : ओह ! ते तर खरंच, तू गुणवान नाहीस असं कोण म्हणतं ?
रूपा : थॅन्क्यू ! (बरोबर आणलेलं सामान गोळा करून स्वतःच्या रूमकड
 जायला निघते.)
बापू : रूपा, अग एवढं काय काय सामान आणलंस ?
लता : आणि आज तू लवकर घरी परतलीयस.
रूपा : मी जाणार आहे. बॅप्स, अरे राखूचा बर्थ डे आहे. त्याला पार्टी
 द्यायचीय. त्याचं सामान आहे.
बापू : बर्थ डे पार्टी ! व्हेरी गुड, पण गिफ्ट काय देणार आहेस ?
रूपा :मी त्याला ब्रेसलेट घेतलंय. हो, पण त्यापेक्षा भारी गिफ्ट म्हणजे मी
 एक डान्स बसवलाय, खास त्याच्यासाठी.
लता :ती पार्टी इथे केलीस तरी वुई हॅव नो ऑब्जेक्शन !
रूपा  : इथे ? शी: हॉटेलमध्ये देणार आहे मी. हां, माझ्या डान्सची झलक
 पाहायची तर दाखवेन तुम्हाला.
बापू  : ( उत्साहाने )येस, व्हाय नॉट.
रूपा  : एक मिनिट ! (सी डी प्लेअरमध्ये सीडी लोड करते. एक इंग्रजी
 गाणं सुरू होतं. त्यावर ती नाचायला लागते. गाण्यानं हळूहळू वेग
 घेतलाय, नृत्य संथ गतीकडून द्रुतलयीत वळतं. इथं जोडीदाराची

रुपक । २९ ।