पान:रुपक.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रवेश दुसरा

(स्थळ तेच : रूपाच्या बोलण्यानं बापू नाराज झालेला आहे. लता त्याला
खुलवण्याचा प्रयत्न करतीय.वेळ दुपारची)
लता  : बापू, हे बघ.
बापू  : हं.....?
लता  : (लॅपटॉपवर ओपन केलेले फोटो दाखवत) बापू, हा तुझा फोटो
 श्रीनगरचा आहे ना ?
बापू  : (फारसा उत्साह नाही ) कोणता ?
लता  : (लॅपटॉप पुढं करत) हे बघ. हा.
बापू  : नाही ग, तो पठाणकोटचा आहे.
लता  : हां, म्हणजे धर्मशालेकडं तुमची कॉन्फरन्स होती त्यावेळचा ना ?
बापू  : हो.
लता  : पण पठाणकोटला काही एवढी थंडी नसते, म्हणजे फोटोत तू ज्या
 अवतारात आहे त्यावरून- -
बापू  : त्यावर्षी 'कोल्ड वेव्ह होती ना उत्तर भारतात. पठाणकोटला
 शुन्यावर गेलं होतं तापमान.
लता  : (तो बोलू लागलाय हे पाहून आणखी उत्साहानं )
 करेक्ट. अरे हा बघ, हा बंजाऱ्याच्या पोशाखातला -
बापू  : बंजाऱ्याच्या नाही. खजियारला काढलाय तो. लोकल ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये.
लता  : बाकी लॅपटॉपमुळं हे फोटो केव्हाही पाहता येतात. मुख्य म्हणजे
 अल्बम सांभाळत बसायची गरज नाही.
बापू  : सीडी जपून ठेवावी लागते ना.
लता  : ती काय आपली सीडी लायब्ररी केवढी तरी मोठी आहे.
बापू  : रूपा कुठं ऑफिसला गेलीय ?
लता  : आज नऊची शिफ्ट होती तिची.
बापू  : पोरीचं स्वतःचं 'लाईफ' म्हणून राहिलं नाही. सतत धावपळ !
 कठपुतळीच झालीय तिची.
लता  : तू फार विचार करू नकोस. ( कडवटपणे)
बापू  : अग ताण किती पडतो तिच्यावर. आणि आपण विचार नाही
  करायचा तर कुणी करायचा ?

रुपक । २२ ।