पान:रुपक.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रूपा  : मला चहा घ्यायचाय. मॉम 5
लता  : (हातातलं काम सोडून) देते बाई
बापू  : काही नको. ही काय चहाची वेळ आहे का ?
रूपा  : मग, चहाची वेळ कोणतीय ?
बापू  : रूपा वाद नको घालूस. मी सकाळपासून तुझी वाट पाहतोय.
रूपा  : आणि मी आलेच नसते तर... मॉम, चहा ऽ ऽ
 (लता आत निघते, तिला थांबवत )
बापू :हे बघ रूपा, पटकन पूजा करू की मग चहाच काय,
 नाश्ताही करू ?
रूपा  : मला नाही वेळ. मी निघालीय.
लता  : अगं चहा करते घेऊन जा ना.
रूपा  : (गडबड करत) ए जाऊ दे आता. मी पळते.
बापू  :( तिला थांबवत ) तुला तसं जाता येणार नाही.
रूपा  : ( गमतीनं) मग कसं जाता येईल ?
बापू  : (अस्वस्थ ) गमतीची वेळ नाही.
रूपा  : हो ना. मला गडबड आहे.
बापू  : अगं पण पूजा---
रूपा  : ती तू घे करून !
बापू  : पण ही घरातल्या बायकांनी करायची पूजा आहे.
रूपा  : ओ ऽ शिट 5 काय रे तुझं हे. मला नाही वेळ.
बापू  : (तिला अडवत ) थांब रूपा. मी सांगतोय ना तुला
रूपा  : ए चल,मी पळते.
बापू  : रूपा बेटा, अग मुलीच्या हातून पूजा व्हावी म्हणून
रूपा  : बॅप्स ! जस्ट किप क्वायेट ! ओ के ?
बापू  : रूपा ?
रूपा :येस. उगाच अडवू नको. राघू माझी वाट पाहतोय.
बापू :मी सकाळपासून तुझी वाट पाहत होतो.
रूपा :मी काय करू मग ?
बापू  : अगं असं काय करतेस...
रूपा  : चल निघते.

रुपक । २० ।