पान:रुपक.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



  यायचं ? अर्ध्या तासात ? चल मी फ्रेश होते. (फोनवर) हं हं बोल.
  काय ? काय सांगतोस ? ओ माय डियर राघू ? हाऊ स्वीट !
  ए, खरं सांगतोयस ना ? की परवा सारखी गंमत करतोयस ?
  रंग कोणताय ? लालम लाल. मस्तच ! मला खूप आवडतो लाल
  रंग ! हो आणि रेड वाईनही ! (बापू अस्वस्थ ) ए चल, मी येतेच
  पटकन, राईट ? ओक्स, सी यू सुन !
बापू  : (कमरेवर दोन्ही हात ठेवून) रूपा ऽ ऽ !
रूपा  : येस बॅप्स, जस्ट वेट ! (आत जाते)
बापू  : ही पोरगी म्हणजे कमाल आहे. इतका वेळ मरगळून गेली होती.
 हाताला धरून उठवायला लागत होतं आणि आता ऽ टणाटण
 उडया मारतीय.
लता  : राघूचा फोन होता ना !
बापू  : अगदी वेळेवर आला त्याचा फोन. पोरगी फटकन तयार झाली.
लता  : पूजेला लांबण नको लावू. लगेच उरक. तिला नाही आवडत
 जास्त वेळ घालवलेलं ?
बापू  : नेहमीचे विधी तर करावे लागतीलच ना ?
लता  : किती अडकतोस कर्मकांडात. मॅनेजरच्या पोस्टवरून
 रिटायरमेंट घेतलीस असं कुणाला खरं वाटेल का ?
बापू  : 'व्हीआरएस' म्हण. वॉलेंटियरी रिटायरमेंट !
लता  : काही काही जण अकाली प्रौढ असतात, तशीच की ती अकाली
 रिटायरमेंट !
बापू  : तू सारखं सारखं माझ्या रिटायरमेंटवर का बोलतीयस ?
लता  : आता रिटायर झाला म्हणून ! त्यात इतकं वाईट काय वाटून घ्यायचं ?
बापू  : तुला म्हणजे--(रूपा येते तिच्याकडं जात) हं, चल रूपा.
रूपा: (घाईघाईत) मॉम, मला फटाककन् चहा देतेस. आय एम टायर्ड !
लता  : यू आर टायर्ड अॅन्ड ही इज रिटायर्ड !
बापू  : नसत्या कोट्या करत बसू नकोस. रूपा S
रूपा: त्याच्याकडं दुर्लक्ष करत मॉम, मी काय विचारतीय ?
 तू देणार आहेस का मी बाहेरच घेऊ ?
बापू: शू ऽ ऽ रूपा ! काय बाहेर ? तुला पूजा करायचीय.

रुपक । १९ ।