पान:रुपक.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रूपा  : (ती रिमोटनं टी व्ही ऑन करते) तेव्हा मी तुला गप्प करण्यासाठी हो
 म्हणाले होते.
बापू: उगाच काही तरी बोलू नको. चल तयार हो !
रूपा: (चॅनल बदलत) काय रे तुझं हे ऽ ! मला जरा बसू दे !
 (आतून लता येते. पूजेचं सामान आणि तसंच काही तिच्या हातात.)
लता : गौर आली गौर आली
  सोन्या मोत्याच्या पावलांनी
  सगळीकडे दृष्टी फिरव
  आनंदी आनंद कर
बापू  : (लताकडं पाहत) ओ. के. झाली ना तयारी. आता मुखवटे आत
  न्यायचे ना ?
रूपा  : ( टी व्ही पाहत बसलीय) मॉम, तू सांग ना बॅप्सला.
लता  : कोण आली गौरी आली, तिला लिंबलोण करा 55
बापू  : (रूपाकडं येत) रूपा, बेटा पुरे हं आता. बंद कर टीव्ही.
रूपा  : (टीव्ही पाहत) बॅप्स, अरे ती आमच्या कंपनीतली रेखा
बापू  : (रिमोट काढून घेत, टीव्ही बंद करतो) बघू नंतर. तू तयार हो
  बी क्विक ! तिला उठवायला लागतो
रूपा  : (नाराज) हे ग काय मॉम. हा मला विश्रांती घेऊ देत नाही.
लता  : एवढं म्हणतोय तर हो ना पटकन तयार.
रूपा  : (तिची नक्कल करत) 'हो ना पटकन तयार 55' बॅप्सच्या
  हाताखाली पूजा करणं म्हणजे सोपी गोट आहे होय ? हे असं कर,
  फुलाला गंधाक्षता लाव. हे आणि ते. छे बाई 55
बापू  : (तिला घरून) रूपा, चर्चा नंतर, मुहूर्त टळतोय. जा तयार हो.
  (तिला आत ढकलतो)
लता  : ( उंबऱ्यात रांगोळीसारखी करत) तिची इच्छा नसली तर बळजबरी
 कशाला करतोस ?
बापू  : इच्छेचा काय प्रश्न ? आं ? पूजा करायला इच्छा लागते का ?
 (रूपा आतून फोनवर बोलत येते.)
रूपा  : अरे हो रे. नक्की. मी येते म्हटलं की येते. कोण ? तो ?
 (बापूकडं पाहते) त्याचं काही नाही. मी पाहते ते. किती वेळात

रुपक । १८ ।