पान:रुपक.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



लता  : ठेवलेत आत देवघरात.
बापू  : आणि गणपती ?
लता  : आता गणपतीची पूजा आहे का गौरीची ?
बापू  : पूजा गौरीचीच आहे, पण गणपती बाजूला हवाच ? ठेवलास का ?
लता  : ठेवते. (आली गवराई अंगणी, तिला लिंबलोण करा,'
  असं पुटपुटत आत जाते.)
बापू  : कमाल आहे तुझी ? गौरीच्या बाजूला गणपती ठेवायचं लक्षात
  कसं नाही तुझ्या ?
लता  : (आतून) तू तो मखरातून हलवला नाही ना म्हणून.
बापू  : (पुन्हा फोन लावतो तो उचलला जात नाही) छे ऽ काय करावं या पोरीला ?
लता  : (येते) चल आपण बसवून टाकू गौरी.
बापू  : (रागाने) काहीतरी बोलू नको. रूपा बसवणार आहे.
लता  : तिला यायला उशीर होतोय तर आपण मुहूर्त का टाळायचा ?
बापू  : तू जरा शांत बस. मला बघू दे काय झालं ते. (बापू फोन लावतो.)
 रिंग दारातच वाजायला लागते. मोबाईलची रिंग आणि दारावरची
 बेल एकदम वाजायला लागते.)
बापू  : (पळत जाऊन दार उघडतो, दारात रूपा) काय हे रूपा, किती वेळ?
 (तिची बॅग किंवा मोठी पर्स जे काही असेल ते घ्यायला लागतो.)
लता  : बघ, आली की नाही वेळेवर उगाच गोंधळ घालत होतास.
रूपा : अरे, अरे ऽ ऽ राहू दे बॅप्स ! हे काय करतो ?
बापू  : अग तुझी बॅग ठेवतो आत. तू पळ, पटकन फ्रेश हो. पूजा करायचीय.
लता  : मी करते बाकीची तयारी ! ( आत जाते)
बापू  : हो तू लाग कामाला. चल रूपा !
रूपा: ए बॅप्स, मी थकलीय रे. थोडा वेळ थांब. उगीच गडबड नको करूस.
बापू  : ते काही नाही (तिला ढकलत ) आधी फ्रेश हो. तुझ्या हस्ते
 करायचंय पूजन.
रूपा  : (ऐसपैस बचत) ए चल, काही तरी काय ?
बापू  : तुला मी सकाळीच सांगितलं होतं.

रुपक । १७ ।