पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
इथल्या मनस्विनीला मात्र आता
कळून चुकलंय
व्हावं लागणारय तिला स्वत:ला
तिला सोडवणारा कृष्ण.

 ती स्वत:तून नव्याने उगवते आहे.

अरूणा ढेरे लिहितात,
माझे पाणी बदलले आहे
माझे जगणे आणि गाणेही बदलले आहे.

 भूमी आणि स्त्री हे मिथक भारतीय मनातला सदाहरित आदिबंध आहे. सर्जनातील मधुर, नवनवोन्तेषी चैतन्य.. अनुभवणारी भूमीस्वरूपा स्त्री, प्रत्यक्ष अंकुरतांना वेदनांची ओंजळ सहजपणे कुरवाळते. वास्तवाला सामोरी जाते. सोशिकपणा, खंबिरपणा ही तिची उर्जा आहे. आज ना. धो. महानोर, विठ्ठल वाघ आदि कवी तिच्या सोसण्याची कीव वा दया व्यक्त करत नाही. तर ते विद्ध होतात.

तुझे दुःख भोगण्याचे माझ्या अंगी येवा बळ
तुझ्या अथांग गंगेचे पाणी वाहू दे निर्मळ...
तुझ्या घळघळ घामाचा आला गहिवर आभाळा
वसां पाठोपाठ वसं बरसला पाणकळा


८२ / रुणझुणत्या पाखरा