पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
धरित्रीचा परिमय
माझं मन गेलं भरी-
धरित्रीच्या कुशीमंदी
बीया बियानं निजली
वऱ्हे पसरली माटी
जशी शाल पांघरली-
बीय टरारे भुईत
सर्वे कोंभ आले वऱ्हे
गहयरलं शेत जसं
अंगावरती शहारे-

 आपले मातीपण, सर्जनचा कोवळा आनंद जपण्याचा स्त्री आटोकाट प्रयत्न करते. 'आत्मदेह समुद्भव' असे म्हणत मानवाला स्वत:हून निर्माण केलेल्या अन्नावर जगवणारी, अन्नदा शाकंभरी देवीप्रमाणे कुटुंबासाठी ती अन्नपूर्णा होते. शेतीचा शोध स्त्रीने लावला हे जगन्मान्य सत्य आहे. आजही सर्वसामान्य कष्टकरी स्त्री तशीच शेतीत रमणारी आहे. पितृत्व आकाशाला वा सूर्याला दिले आहे. चैतन्याचे हिरवे... सुगंधी गाणी गाणारी मात्र धरित्री असते.
 कवी ना. धा. महानोर लिहितात,

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतुनी चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लखडून जावे

 सर्वसामान्य स्त्रीला क्षणोक्षणी अत्याचार, संकटे, अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु हे सहन करत ती कुटुंबाचे घरपण सांभाळते. सुंदर घर ...खोपा हे तिचे जीवन स्वप्न असते. पण...
 की महानोर 'तिची कहाणी' त नोंदवतात.
ती रोज ओवी गाते सूर्यासाठी
संसारातल्या सुखदुःखासाठी
पण
खोपा खोपा जपतांना
कंठ भरून गातांना
झिम झिम पाऊस बरसल्यानं

८० / रुणझुणत्या पाखरा