पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शेतीतून निघणारे धान्य आणि पशुधन हा दोहोंच्या एकात्म समृद्धीचे प्रतीक म्हणजे दिवाळी.
 इ.स. १ ते ४०० या काळात हा सण यक्षरात्री म्हणून रूढ होता. वात्स्यायनाने कामसूत्रात या सणासाठी हे नाव वापरले आहे. कनोजचा राजा हर्षवर्धनाने नागानंद नाटकात या सणाला 'दीपप्रतिपदुत्सव' असे नाव दिले आहे. हा काळ इ.स. ६०० चा. नीलमत पुराणात या सणास दीपमाला असे संबोधले असून त्याचे विस्तृत वर्णन आहे. या पुराणाचा प्रचार काश्मिरमध्ये होता. नवी वस्त्रे परिधान करणे. घर स्वच्छ आणि सुशोभित करणे, देवळे... घरे दिव्यांनी सजवणे, द्यूत खेळणे आणि भाईबंदांनी एकत्र येऊन मिष्टान्न सेवन करणे ही या सणाची वैशिष्टये वर्णिली आहेत. अल्बेरूनीने प्रवासवर्णनात या सणाचा उल्लेख केला आहे. कन्नड शिलालेखातही या सणाचा उल्लेख आहे. महमद गझनी व अफगाण राजेही हा लोकात्सव साजरा करीत असा उल्लेख आहे.
 अबुल फजल याच्या 'ऐने अकबरी' या इतिहास ग्रंथात लिहिले आहे की दिवाळी हा देशातील सर्वात मोठा सण, वैश्य समाज हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करी. घरोघरी दिवे लावीत. दिवाळीचे महत्वाचे सहा दिवस असतात. वसुबारस, धनतेरस, नरकचतुदर्शी, अमावस्या-दीपपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज, वसुबारसेला गाईची पूजा करतात. गायवासरांना स्वच्छ करतात. गोठा स्वच्छ करतात. गुरांना पंचारतीने ओवाळतात. पुरणावरणाचा नैवेद्य करतात. गोठ्यातील मोकळ्या जागेत

७२ / रुणझुणत्या पाखरा