पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करीत असतात. आमचे सेन्सॉर बोर्ड अत्यन्त विकलांग आणि विकृत मनोवृत्तीचे तर नाही ना अशी शंका येते. या सर्वांवर मात करायची तर मुलांमध्ये वाचनाची आवड वाढवायला हवी. चित्र काढणे... गोष्टी ऐकणे... पुस्तके वाचणे, गाणी गाणे, सहलीला नेणे यांची 'झुंबड' निर्माण करून सुसंस्कारांची पेरणी फवारणी करण्याचे आव्हान शिक्षक पालक पेलू शकतात. पालक शिक्षक यांच्यातील संवाद, अनुबंध अधिक प्रभावी व्हायला हवा. तसेच घर फक्त आई वा बाईचे किंवा दोन वेळच्या जेवणासाठीचे, ही संकल्पना बदलायला हवी. घरातील कामात पुरूषांचाही सहयोग हवा. कुटुंबाचा सांगाडा न राहता ते ज्येष्ठांना लहानांना आधार नि संस्कार देणारे 'घर' व्हावे. ज्येष्ठ नागरिकांनी या कामात विशेष रस घ्यायला हवा. हे रचनात्मक वादळ जागवले तरच आजचे २१ वे शतक प्रकाशमय शांतीचे जाईल.

६८ / रुणझुणत्या पाखरा