पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आता मी ही व्याख्या पुन्हा सांगतो की ललितगद्य हा उभयलिंगी वाङ्मयप्रकार आहे. वैचारिक निबंध आणि कवितेचा त्यात अप्रतिम 'अर्धनटनारीश्वर' झालेला दिसून येतो.
 प्रवासवर्णन, व्यक्तिचित्र, विनोदी लेख आणि निसर्गावर ललितगद्यात सर्वात महत्त्वाची ठरते ती लेखकाच्या संवेदनस्वभावाचा अपरिहार्य घटक असले व त्याची वैचारिकता त्याचे अलोकतारतम्य ही वैचारिकता एवढी तरह, सुक्ष्म, प्रखर आणि उत्कट असते की कवितेखेरीज कोणीच तिला पेलू शकत नाही. अशा वेळी भावुक होऊन वाचऊ म्हणतात की हे साक्षात् 'गद्यकाव्य'च आहे!
 कवीनं लिहिलेलं ललितगद्य हा माझ्यासाठी नेहमीच भुवया उंचवायला लावणारा, विलक्षण कौतुकाचा आणि स्वागताई प्रकार असतो.
 विंदा करंदीकर, आरती प्रभु, ग्रेस यांनी ललितगद्य लिहिले नसते तर?
 पाडगावकरांनी आपली सगळी शक्ती कवितेतच पणाला लावली आणि खर्चुन टाकली. या कवीने 'निंबोणीच्या झाडामागे' लिहून काय उपयोग? पु. ल. देशपांडे या कवीने अजिबात कविता न लिहिता सगळी शक्ती ललित गद्यावर पणाला लावली. मराठीचे सर्वश्रेष्ठ ललितगद्यकार तर ते आहेतच पण प्रवासवर्णन, व्यक्तिचित्र, विनोद आदी सर्व शक्यतांना कवेत घेणारी महान अशी त्यांची प्रतिभा होती. आणि पु. लं. एवढे कवितेवर कुणी प्रेम केले आहे काय?
 प्रखर तरीही तरल वैचारिकता आणि काव्यप्रतिभा या दोन गोष्टी एकाच संवेदनस्वभावात असणाराच श्रेष्ठ दर्जाचं ललितगद्य लिहू शकतो. प्रवासवर्णनात ते प्रवासस्थल निमित्त मात्र असते; व्यक्तिचित्रात ती व्यक्ती काय आहे या पेक्षा चित्रण करणाराला काय भावले हे महत्त्वाचे असते आणि परम कारुणिक असल्याशिवाय परिहासात्मक, सदअभिरुचीसंपन्न विनोद संभवत नाही. चि. वि. जोशी, पु. ल. देशपांडे, माधव आवचट, मधुकर केचे, ग्रेस, गो. वि. करंदीकर, चि. त्र्यं. खानोलकर यांच्या प्रतिभेत ललितगद्याच्या सुंदर शक्यतांचा प्रदेश कवेत घेण्याची ताकद होती. मंगेश पाडगावकर, कुठे तरी कमी पडले. रमेश मंत्री, महेश एलकुंचवार, यांच्या संवेदनस्वभावात कणभर कविश्व नव्हते. म्हणून त्यांचे ललितगद्य यशस्वी होऊ शकले नाही.
 महान ललित गद्य लिहिले जाण्याची उपरोक्त सर्वच्या सर्व कारणे डॉ. शैला लोहिया यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वात आणि संवेदनस्वभावात उपस्थित आहेत.त्यांच्या

रुणझुणत्या पाखरा / सात