पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'प्रेम' म्हणजे नेमके काय? या विचारावर गेली हजारो, शेकडोवर्षे कवींनी कथा, कविता, नाटके लिहिली. आपापले विचार... मते मांडली. तरीही ते कधीच शिळे झालेले नाही. प्रेमात पडायला वय, धर्म, जात काहीही आडवे येत नाही. प्रेम सततच्या सहवासामुळे निर्माण होते की 'प्रथम तुज पाहता जीव वेडावला' या प्रकारचे असते? ती ओढ दोन मनांच्यात असते की तनांच्यात? ती दोन भिन्नलिंगी जीवांची संवेदनशील बांधिलकी असते असे आजवर ठामपणे सांगितले जाई. पण गेल्या पंचवीस वर्षात समलिंगी आकर्षणालाही समाज सामावून घेऊ लागला आहे. १९८७ मध्ये तेव्हाच्या पश्चिम जर्मनीत मौलोफला आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस जाण्याची संधी मिळाली. परिषदेनंतर दोन दिवस ब्रेमनला तिथल्या महिला विभागाची कार्यकर्ता ख्रिस्ता डुरकडे रहाण्याचा योग आला. तिथे 'लेस्बियन' या शब्दाची ओळख झाली. जर्मनीतील शेतकरीण, आठवडे बाजार, संकटग्रस्त स्त्रियांचे दिलासाघर यांना भेट द्यायचे ठरले होते. खिस्टा आणि ऊलाने एका कॉफी हाऊसमध्ये नेले. आणि सांगितले ते एका समलिंगी जोडप्याने सुरू केले आहे. तिथे अशी जोडपी दिसतील. 'डोन्ट गेट ऐक्साइटेड' असेही बजावून सांगितले. एका वेगळ्या प्रेमाची ओळख झाली. अशा व्यक्तींना लेस्बियन म्हणतात.
 मुळात प्रश्न पडतो प्रेम दोन जीवांचे, मनांचे की त्या जीवांनी धारण केलेल्या देहांचे. म्हणूनच प्रेमाच्या आड धर्म, जात येत नाही. पण परंपरेने देहाला मात्र धर्म दिला

५८ / रुणझुणत्या पाखरा