पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही होऊ शकतो. लघु निबंधातून सर्वस्वी नवीन असा ललित गद्य जन्माला येतो हेही लक्षात घेतले पाहिजे.
 ललित गद्य हा एक उभयलिंगी वाङ्मयप्रकार आहे. त्यात कवितेची कमनीयता, स्त्रीसुलभता आणि वैचारिक आणि पौरुष यांचा सुंदर संयोग झालेला असतो.
 डॉ. सुधीर रसाळ यांनी 'अनुभवाचे असे आकार जे कथा, कादंबरी, एकांकिका, नाटक या प्रकारातून व्यक्त होऊ शकत नाहीत, त्याला ललित गद्य म्हणावे अशी नास्तिपक्ष मांडणारी व्याख्या केली आहे. आठवणी प्रवासवर्णन, निसर्गवर्णन, विनोद, व्यक्तिचित्र अशा सगळ्यांना सामावून घेणारे ललित गद्य हे 'महापोर्ट' आहे असंही म्हटलं जातं.
 वरील तिन्ही विचारांत ललित गद्याची निरनिराळी वैशिष्ट्य आणि लक्षणं सूचित होतात.
 आजचे ललितगद्य हे पूर्वीच्या लघुनिबंधाचे उत्क्रांत रूप आहे. लघुनिबंधाला वैचारिक निबंधापेक्षा वेगळा मानून एक ललितकलेत समाविष्ट होणारा असा वाङ्मयप्रकार म्हणून इ.स.१५८० च्या आसपास प्रथम फ्रेंच लेखक माँर्तन यांनी रूढ केले असे मानले जाते. प्रा. नरहर कुरुंदकरांनी आल्फा ऑफ प्लो पासून लघुनिबंधाची सुरुवात मानली आहे. मराठीत ना. सी. फडके यांनी गुजगोष्ट म्हणून आणि वि. स. खांडेकरांनी लघुनिबंध म्हणून जो चार्ल्स लॅम्बना लिहिला तो या 'पर्सनल एस्से' ला मराठीत आणण्याच्या भूमिकेतून अनंत काणेकर, म. ना. अदवंत, हेही याच माळेचे मणी. इंग्रजी साहित्यात ज्याला 'एसे' किंवा निबंध म्हणतात त्यात विचारांची वस्तुनिष्ठ मांडणी असते. अनुभवाचे किंवा 'मी' चे निवेदन करणे हा त्याचा हेतू नसतो. तिथे अनुभव हे साध्य मुळीच असत नाही. त्या उलट लघुनिबंधाचे १ लघु निबंधात अनुभव आणि तदनुषंगिक विचारांचा विमुक्त असा आविष्कार असतो.
 मराठी समीक्षेत ललित वाङ्मयाचा एक प्रकार म्हणून चर्चा करताना त्याची तुलना ललित वाङ्मयाच्या इतर प्रकारांशी करण्याची पद्धत रूढ झाली आहे. कथा कादंबरी- एकांकिका- नाटक यांच्याशी त्याची तुलना करणे निरर्थक आहे. त्यातून डॉ. सुधीर रसाळांनी केली तशी अभावात्मक व्याख्याच संभवते. मग वेद जसे देवाचं वर्णन अमुक म्हणजे तो नाही, तमुक म्हणजे तो नाही. असं 'नेति नेति'च्या भाषेत करतात तसा प्रकार एक वाङ्मयप्रकार म्हणून ललित गद्याच्या बाबतीत होतो. आणि मग

रुणझुणत्या पाखरा / पाच