पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना


 कथा व कविता हे आरंभापासून वाङ्मयाचे मूलभूत प्रकार दिसून येतात. प्राचीन व मध्ययुगीन वाङ्मयात त्यांचीही सरमिसळ झालेली दिसते. ऋग्वेदात कथात्मता आणि काव्यात्मता यांचे एकजीव व अनेकदा मोठ्या विलोभनीय स्वरूपात प्रत्ययाला येते. कथा आणि कवितेचा जन्म जरी एका वेळी झालेला असला तरी कथात्मक वाङ्मयाचा विकास अधिक झालेला दिसून येतो. मुद्रण कलेमुळे अठराव्या शतकानंतर वाङ्मयप्रकारांना निश्चित आणि नवीन अशी रुपे प्राप्त व्हायला लागली. प्रत्येक सजीवत्वाला काही अवस्थांमधून जाणे श्रम प्राप्रच असते. हे लक्षात घेऊन 'फॉर्म' ची 'फॉर्म' म्हणून जी वाटचाल आहे ती सांगणे महत्त्वाचे असते. वाङ्मयेतिहास लिहिणारांकडून नेमकी इथेच चूक होते. ते प्रायः अशा याची वाटचाल सांगताना दिसतात; 'फॉर्म' ची नाही. ही चूक आपल्याला टाळता आली पाहिजे.
 आणखी एक चूक संभाव्य असते. कथा आणि कादंबरी, एकांकिका आणि नाटक यांच्यातला फरक हा संख्यात्मक असतो; गुणात्मक नाही. जी. ए. कुळकर्णी किंवा आसाराम लोमटे यांच्या कथांना अनेकदा लघुकादंबरी म्हणता येईल. 'सावित्री' आणि 'मानव' मधील लेखनाची तपासणी करताना अशा प्रकारच्या फोल चर्चेचे घोळ घालता येतील. अनेकत्वातून एकख सूचित करणे हो सर्वच ललित कलांचा धर्म आहे. लघुकथेतील अनेकत्व हे कादंबरीच्या मानाने कमी असते असे म्हणावे हाच न्याय एकांकिका आणि नाटक यांना लावता येईल.
 मुद्रणकलेमुळे जसे वाङ्मयप्रकारांना निश्चित आणि नवीन स्वरूप येऊ लागले तसे काळाच्या आणि उत्क्रांतीच्या ओघात नाट्यछटेसारखा एखादा वाङ्मय प्रकार नष्ट

चार / रुणझुणत्या पाखरा