पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करण्यासाठी बौद्ध धम्माचा स्वीकार करून 'धम्म'वरही नवा प्रकाश टाकला. त्यांना या निमित्ताने प्रमाण करण्याऐवजी त्यांनी सांगितलेल्या धम्माचा शोध घेणे प्रकाश देणारे आहे.
धम्मावर नवा प्रकाश
 ६ डिसेंबर १९५६ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. महात्मा गौतम बुद्धांचा 'धम्म' १४ ऑक्टोबर १९५६ दसऱ्याच्या दिवशी स्वीकारल्यानंतर अवघ्या ४३ दिवसांनी त्यांचे परिनिर्वाण झाले. अर्थात त्या आधी अनेकवर्षे त्यांचे चितंन सुरू होते. बाबासाहेबांनी दलित समाजातल्या सामान्य व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचे धाडस दिले. निसर्गाने वर्ण व्यवस्था निर्माण केली नाही. ती आपमतलबी माणसाने स्वार्थासाठी निर्माण केली असल्याचा एहेसास... ठाम विश्वास त्यांनी दिला. परंतु त्याही पूर्वी सवर्ण मानल्या जाणाऱ्या अनेकांना ही समज महात्मा गांधीजींनी दिली. त्यांनी दलितांना परमेश्वराला प्रिय असणारी माणसे ...'हरिजन' असे संबोधले. अर्थात ज्यांना परमेश्वर वा ईश्वर ही संकल्पनाच मान्य नाही अशांना ..नव बौद्धांना ते आवडले नाही. पण अनेक कुटुंबे गांधीजींच्या विचारांनी भारावलेली होती. मला पहाटे चरख्याच्या लयबद्ध आवाजाने जाग येई. आई पप्पा चरख्यावर सूत कातीत असत. त्याच सुताने विणलेल्या खादीचे ते कपडे वापरीत. वयोमान व कामाच्या व्यापामुळे चरखा खुंटीला टांगला गेला. पण अखेरपर्यन्त त्यांच्या अंगावर खादीच होती. आईला जुन्या रीती नुसार अहेवमरण आले. एका गृहस्थांनी हिरवी साडी त्या सामानात आणली. ती पाहून पपांनी मला खूण केली. मी तात्काळ विनंती करून ती साडी परत केली. केवळ त्यांच्या समाधानासाठी हिरव्या काठांची शुभ्रसाडी आणली. तिच्या इच्छेनुसार मंत्रविधी न करता भडाग्नी दिला.
 राष्ट्र सेवा दल, पू. सानेगुरूजी, एस.एम.जोशी, डॉ. राम मनोहर लोहिया, बॅ. नाथ पै, जयप्रकाशजी अशा अनेकांचा प्रत्यक्ष सहवास ही माझी माहेरची मिळकत... समृद्धी. घरच अ किंवा न जातीय होते. आई हरिजन सेवा संघाची २५ वर्षे अध्यक्षा होती. मुलींच्या वसतीगृहातील होतकरू मुलींना पपा कोर्टातून आल्यावर इंग्रजी व गणित शिकवीत. पाण्यापर्यन्त सर्वांचा वावर. पण 'बाईंच्या' म्हणजे आईच्या घरात 'हात स्वच्छ धुणे' हेच सोवळे.
 त्यावेळी अनेक सवर्ण... ब्राह्मण घरांतील धुरिणांनी जातीयता नाकारली होती. हरिजन सेवा संघाचे संस्थापक काकासाहेब बर्वे हे त्यापैकी एक. त्यावेळच्या धुळे जिल्ह्यात राष्ट्र सेवा दलाच्या अनेक शाखा, जातपात न माननारी... खुले, समतोल

४४ / रुणझुणत्या पाखरा