पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गायिका वगैरे. लाखात एखादीच बुद्धीमत्तेच्या बळावर विद्यावाचस्पती, योगिनी होत असे. कुंठित झालेल्या सर्वसामान्य विशाल बहुजनांना, गौतमबुद्धाच्या 'धम्मा' ने जगण्याची नवी दिशा दाखवली. 'धम्म' सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत माणसामाणसांतील व्यवहार उचित ठेवावेत. असावेत. ते एकमेकांवर कुरघोडी वा अन्याय करणार नसावेत. असा 'धम्म' शासनाने साधन म्हणून स्वीकारला तर समाजात अराजक, स्वैराचार, हुकूमशाही माजणार नाही. एखाद्याने धम्माचे उल्लंघन केले तर त्याला शासन देणारा हुकूमशहा नसेल तर न्यायाधीश असेल. आणि अशा समाजात सर्वच स्वातंत्र्याचा आनंद घेऊ शकतील. बुद्धाच्या धम्माच्या दोन कोनशिला आहेत. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. खुळया, अंधश्रद्धांना तेथे थारा नाही. आणि करूणा म्हणजे प्रेम, करूणेशिवाय माणूस जगू शकणार नाही. स्वत:ची उन्नतीही करू शकणार नाही. आणि म्हणूनच या धम्माने सामान्य माणूस उपेक्षित, निराधार, एकाकी स्त्रिया, चुका उमजलेले पश्चातापदग्ध स्त्री पुरूष यांच्या जगण्याला आधार दिला. जगण्याची... धम्मानुसार जीवन उज्ज्वल करण्याचीच ऊर्जा दिली.
 नेपाळ, थायलंड, चीन येथे मला जाण्याचा योग आला. तेथे आजही बौद्ध धर्माची पूजास्थाने... पॅगोडे... विशिष्ट शैलीत बांधलेली, आढळतात. बोधिसत्वाचे विविध आकाराचे पुतळे आहेत. ओठावरचे एक निरंकारी स्मित, जे पूर्ण चेहेरा शून्यात्मक तृप्तीने उजळून टाकते, ते पहाणाऱ्यालाही धम्माचे वेगळेपण सांगून जाते.
 गौतमाने त्याला पडणाऱ्या दोन प्रश्नांनी सतत सतावले. त्यांचा शोध घेण्यास उद्युक्त केले. व्यक्तीला होणाऱ्या दुःखाची कारणे कोणती? आणि हे दुःख नाहीसे कसे होईल? हा शोध घेतांना स्वत:तले दोष काढण्यासाठी त्यावर लक्ष केन्द्रित केले. सोनार चांदीतले कीटण काढून ती शुद्ध करतो तसे मनातील अशुद्ध विचार, वासना, द्वेष, खुशामत करण्याची वृत्ती यांचा त्याग केला. दहा स्थित्यंतरे झाल्यावर तो 'स्व' पासूनही दूर गेला. अनंतस्वरूप झाला. बोधिसत्व न रहाता बुद्ध झाला. 'धम्म'चे आगळेवेगळेपण शब्दांतून व्यक्त करण्याचे सामर्थ्य आले. लाखोंची जीवने उजळून गेली.
 गेल्या तीन/चारशे वर्षात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. गळ्यात धुंकण्यासाठी मडके, रस्त्याच्या कडेने काट्याकुट्यातून चालण्याची जबरदस्ती, स्त्रियांनी पोटऱ्या उघड्याटाकून लुगडे नेसणे... शिक्षण नाही. एक अंधार यात्राच. या अंधारयात्रेत ज्ञान आणि करूणेचा प्रकाश निर्माण करणारे महापुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी हा नवा प्रकाश अंधारयात्रींच्या जीवनात निर्माण

रुणझुणत्या पाखरा / ४३